मुंबई-गोवा मार्गावर तयार सिमेंट मिक्स घेऊन जाणारे टँकर उलटले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : सिमेंट मिक्स घेऊन जाणारे टँकर उलटल्याची घटना १७ सप्टेंबर राेजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. याचदरम्यान मालवाहू ट्रक बाजूपट्टीवरील मातीवर जाऊन धडकला. हे दाेन्ही अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात झाले असून, सुदैवाने यामध्ये काेणालाही दुखापत झालेली नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर शुक्रवारी, दि. १७ रोजी सायंकाळी टँकर (एमएच १२, पीक्यू ६४२२) तयार सिमेंट घेऊन जात हाेते. भाेस्ते घाटात आल्यावर चालकाचा ताबा सुटला आणि टँकर पलटी झाले, तर ट्रक (आरजे २७, जीसी ९४०४) वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक बाजूपट्टीवरील मातीवर धडकून उलटला. भोस्ते घाटात अपघात घटनास्थळावर पोलीस पोहोचले होते. वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अपघातानंतर वाहनावरील वाहतूक विस्कळीत झाली हाेती.