शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Ratnagiri: साताऱ्यातील भोंदूबाबासह दोन साथीदारांना अटक, गुप्तधनाची बतावणी करुन घातला होता ४१ लाखांला गंडा

By अरुण आडिवरेकर | Updated: August 31, 2023 19:00 IST

खेड : राहत्या घरात असलेले गुप्तधन तांत्रिक पूजापाठ, होमहवन करून काढून देतो, अशी बतावणी करून ४० लाख ९० हजारांची ...

खेड : राहत्या घरात असलेले गुप्तधन तांत्रिक पूजापाठ, होमहवन करून काढून देतो, अशी बतावणी करून ४० लाख ९० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार भरणे (ता. खेड) येथे घडला. या प्रकरणी साताऱ्यातील भोंदूबाबा आणि त्याच्या दोन साथीदारांना खेड पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील गिरेवाडी व करंजवडे येथून अटक केली आहे. या तिघांना खेड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात बुधवारी (३० ऑगस्ट) रोजी हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.हा प्रकार मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला असून, प्रसाद हरीभाऊ जाधव (४७, रा. गिरेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), विवेक यशवंत कदम (४८, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) व ओंकार विकास कदम (२३, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहे. याप्रकरणी भरणे येथील महिलेने फिर्याद दिली. या महिलेला मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये एका गरीब व कष्टकरी महिलेला विश्वासात घेत भोंदूबाबांनी घरातील गुप्तधन काढून देतो आणि कोट्यवधी रुपये मिळवून देतो, असे सांगून ४० लाख ९० लाखाला लुबाडले. या फसवणूकप्रकरणी महिलेने खेड पाेलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.खेड पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (१), २ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी तीनही भोंदूबाबांना शोधण्याकरिता तपासाची चक्रे फिरवली. खेड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पाेलिस काॅन्स्टेबल राहुल कोरे, रूपेश जोगी यांच्या सहकार्याने या तिघांनाही गिरेवाडी व करंजवडे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर