शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

अडीच वर्षांचा पाठपुरावा आला कार्मी...

By admin | Published: December 17, 2014 9:43 PM

चिपळूण तालुका : पाणी योजना जमा-खर्चाची फाईल सुपूद

अडरे : चिपळूण तालुक्यातील कामथे ग्रामपंचायत पाणी योजनेच्या जमा - खर्चाची फाईल ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळविण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या कार्यकारिणीच्या प्रयत्नाला यश आले आहे. पंचायत समितीच्या मासिक बैठकीत झालेल्या पाणी पुरवठा कमिटीचे माजी अध्यक्षांकडून प्राप्त झालेली फाईल सभापती, उपसभापती, गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली. या योजनेच्या करण्यात आलेल्या आॅडीटमध्ये आक्षेप नसला तरी ग्रामपंचायत पुनश्च: त्याचे आॅडिट करणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करु, असे सांगण्यातआले. चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा सोमवारी छत्रपती सभागृहात झाली. या सभेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या पाणी योजनेच्या जमा - खर्चाची फाईल निवडणुकीनंतर नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीच्या ताब्यात देण्यात आलेली नव्हती. ही फाईल नसल्याने पाणी पुरवठ्यासंदर्भात अनेक अडचणी येत होत्या. ग्रामपंचायतीने वेळोवेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्याला यश येत नव्हते. पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेकवेळा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अखेरीस ग्रामपंचायतींच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यासंदर्भात पाणी पुरवठा समितीचे माजी अध्यक्ष किसन माटे याना ही फाईल सुपूर्द करण्याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र, याबाबत पुढे कोणतीच कार्यवाही झाली नव्हती. अखेर हा प्रश्न सुटला असून ही फाईल ग्रामपंचायतीला मिळाली आहे.अखेर पाणी योजनेच्या हिशोबाची फाईल मिळाल्याने या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)