शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
5
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
6
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
7
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
8
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
9
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
10
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
11
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
12
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
13
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
14
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
16
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
17
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
18
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
19
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
20
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

कुंभार्ली येथे वाशिष्ठी नदीत दोन मुलं बुडाली; रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता

By संदीप बांद्रे | Published: July 09, 2023 11:07 PM

चिपळूण शहरातील आठ मुले सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील कुंभार्ली गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीतील वजहर याठिकाणी दोन मुले  बुडाल्याची घटना रविवारी (९ जुलै) सायंकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. शोध मोहिमेसाठी एनडीआरएफची टीम मागविण्यात आली आहे.

चिपळूण शहरातील आठ मुले सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यामध्ये इब्राहिम काजोरकर (गोवळकोट रोड), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट रोड), फरहान हिदायत पिलपिले (खाटीकअली चिपळूण), अली नियाज सनगे (बेबल मोहल्ला, चिपळूण), जहिद हनीफ खान (कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (भेंडी नाका चिपळूण), आतीक इरफान बेबल (बेबल मोहल्ला), अब्दुल कादीर नोशाद लसणे (जिव्हाळा सुपर बाझार शेजारी, चिपळूण) यांचा समावेश होता.

शिरगाव येथील वजहर याठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले. पावसाची मोठी सर आल्याने सहा जण एका झोपडीखाली जाऊन थांबले. याच दरम्यान आतिक बेबल व अब्दुल कादिर लसणे यांनी डोहात उडी मारली. त्यानंतर ते बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायतीमार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल व अब्दुल कादिर लसणे दोघेही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होते.

टॅग्स :Chiplunचिपळुण