दापोली : गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी अनेक घरे असल्याने त्यांना भविष्यात धोका होण्याची भीती आहे.
अधिक धोका असलेल्या दोन घरातील कुटुंबांना तत्काळ घर खाली करण्यास सांगण्यात आले. ते सर्वजण सुरक्षित असले तरी या आसपासच्या घरांबाबत हा धोका कायम आहे.
पाजपंढरी गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला उंच असा डोंगर आहे. एका बाजूला उधाणाच्या लाटांची भीती आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर खचण्याची भीती आहे. या लोकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे डोंगर प्रभावित क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करावे अशी मागणी जोर धरत आहे.
या गावातील सुमारे शंभर ते सव्वाशे घरे आहेत. या साऱ्यांना हा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा समुद्रातील वादळांप्रसंगी या कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या जातात. त्यामुळे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही.
अलीकडे या डोंगरावर काही लोकांनी जमिनी खरेदी केल्या असून, तेथे बंगले बांधण्याचे प्रयोजन आहे. ठिकठिकाणी मशिनरीचा वापर केला जात आहे. त्यामुळे डोंगरावरुन दरड कोसळण्याचा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कामांमुळे डोंगरातून वाहणारे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून, डोंगरावरील उत्खननामुळे पावसाचे पाणी डोंगरात मुरले जात आहे. त्यामुळे या डोंगराचा भाग कधीही सुटू शकतो व या दरडी लोकांच्या वस्तीवर पोहोचू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याची यंत्रणेने तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी अनेक घरे असल्याने त्यांना भविष्यात धोका होण्याची भीती आहे.
अधिक धोका असलेल्या दोन घरातील कुटुंबांना तत्काळ घर खाली करण्यास सांगण्यात आले. ते सर्वजण सुरक्षित असले तरी या आसपासच्या घरांबाबत हा धोका कायम आहे.
पाजपंढरी गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला उंच असा डोंगर आहे. एका बाजूला उधाणाच्या लाटांची भीती आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर खचण्याची भीती आहे. या लोकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे डोंगर प्रभावित क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करावे अशी मागणी जोर धरत आहे.
या गावातील सुमारे शंभर ते सव्वाशे घरे आहेत. या साऱ्यांना हा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा समुद्रातील वादळांप्रसंगी या कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या जातात. त्यामुळे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही.
अलीकडे या डोंगरावर काही लोकांनी जमिनी खरेदी केल्या असून, तेथे बंगले बांधण्याचे प्रयोजन आहे. ठिकठिकाणी मशिनरीचा वापर केला जात आहे. त्यामुळे डोंगरावरुन दरड कोसळण्याचा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कामांमुळे डोंगरातून वाहणारे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून, डोंगरावरील उत्खननामुळे पावसाचे पाणी डोंगरात मुरले जात आहे. त्यामुळे या डोंगराचा भाग कधीही सुटू शकतो व या दरडी लोकांच्या वस्तीवर पोहोचू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याची यंत्रणेने तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.
...................................
मुसळधार पावसाची विश्रांती
आधी वादळाने दणका दिल्यानंतर आता मुसळधार पावसाने दापोली तालुक्यात ठाण मांडले होते. सुदैवाने बुधवारी सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली. या तीन दिवसात ग्रामीण भागात घरे, गोठ्यांचे अंशत: नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. पाजपंढरीतील दरड कोसळण्याखेरीज कोठेही मोठी दुर्घटना घडलेली नाही. कोठे नुकसान झाले असल्यास तातडीने घटनास्थळाला भेट देऊन त्याचे पंचनामे करण्याची सूचना महसूल प्रशासनाकडून तलाठी तसेच मंडल अधिकारी स्तरावर देण्यात आली आहे.