शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सुमो झाडावर आदळून दोन ठार

By admin | Published: June 05, 2016 12:13 AM

कुवे येथील दुर्घटना : मृतात चालकासह एक मुंबईचा; ९ जण गंभीर जखमी

लांजा : देवदर्शन करून परत जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील टाटा सुमो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात चालकासह दोघे ठार झाले, तर अन्य ९ जण गंभीर, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजता कुवे येथे घडली. रवींद्र शांताराम भाताडे (४०, मुंबई), चालक मंगेश दत्ताराम डोंगरे (४५, वाघणगाव) असे ठार झालेल्याचे नाव असून, यामध्ये वाघणगावच्या पोलिसपाटील अश्विनी विजय माईल (५०), संकेत विजय माईल (२२), साहिल विजय माईल (१७), तेजस प्रकाश माईल (१६), तुषार प्रकाश माईल (१९), सुदेश पांडुरंग चौकेकर (२१), अथर्व रवींद्र भाताडे (११), खेतल विजय भाताडे (२१), नुपुरा रवींद्र भाताडे (३८) हे गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यातील वाघणगाव येथील अश्विनी विजय माईल यांच्या घरी मुंबईतून भाताडे कुटुंबीय आले होते. शनिवारी सकाळी चालक मंगेश दत्ताराम डोंगरे यांच्या मालकीची असलेली टाटा सुमो (एमएच-०४-जीई- २५६८) ही गाडी घेऊन नाणीज येथे फिरण्यासाठी हे दोन्ही कुुटुंबीय निघाले. दुपारी नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज मठामध्ये दर्शन घेऊन ते पुन्हा लांजा येथे आले. लांजात आल्यानंतर घरामध्ये लागणाऱ्या चिजवस्तू, बरोबर गोडेतेलाचे दोन डबे, मिठाची एक बॅग असे सामान खरेदी केले. यानंतर ते लांजा कुवेमार्गे वाघणगावला जात होते. लांजाहून जवळपास ३ किलोमीटर गेल्यावर हा अपघात घडला. चालक मंगेश याला वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने गाडी समोरील आकेशियाच्या झाडावर जाऊन आदळली. त्यावेळी गाडीमध्ये १२ जण होते. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालक मंगेश डोंगरे याचा सायंकाळी उशिरा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोंगरे हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या बरगड्यांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघात घडल्याचे लक्षात येताच महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यातील प्रवाशांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. अपघात झाल्यानंतर जखमी सर्व जणांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेचे चालक संदेश घडशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुग्णवाहिकेचे चालक रणजित सार्दळ, मराठा सेवा संघाच्या रुग्णवाहिकेचा चालक राजू जाधव, राजू हळदणकर, शिवाप्पा उकली, योगेश सुर्वे, संजय यादव, तुषार लांजेकर आदींनी मदत केली. लांजा ग्रामीण रुग्णालयात सर्व जखमींना दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये नितीन माईल हा किरकोळ जखमी झाला असल्याने त्याने अपघाताची खबर लांजा पोलीस स्थानकात दिली आहे. खबर मिळताच लांजा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भागत, हेड कॉन्स्टेबल सुरेश शिरगावकर, ललित देऊसकर, नंदू सावंत, संतोष झापडेकर, चालक सतीश साळवी, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)