शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची तारीख घोषित केली; म्हणाले, तोवर हाच पठ्ठ्या काम करणार
2
१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य
3
सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 
4
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
5
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
6
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
7
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
8
“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
9
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
10
ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम 
11
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
12
मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा
13
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
14
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
15
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
16
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
17
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."
18
Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं
19
दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका
20
ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे

रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल सव्वादोन लाख ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज

By शोभना कांबळे | Published: July 18, 2024 7:18 PM

रत्नागिरी : ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन ५७ हजार २६९ तर ऑफलाइन पद्धतीने १ लाख ...

रत्नागिरी : ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन ५७ हजार २६९ तर ऑफलाइन पद्धतीने १ लाख ६२ हजार ८०८ असे एकूण २ लाख २० हजार ७७ महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्याला एकूण असलेल्या २ लाख ९३ हजार ६७६ उद्दिष्टांपैकी ७४.९४ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात राजापूर तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून, दिलेल्या २९,९३७ उद्दिष्टांपैकी २८,९०४ दाखल झाले आहेत. या तालुक्याचे ९६.५५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.महिलांना सक्षम करण्यासाठी, तसेच महिला घरातील आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा, यासाठी राज्य सरकारने १ जुलैपासून ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ ही योजना राबविण्याचा देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात जोरात सुरु आहे. महिला लाभार्थींना या योजनेचा लाभ घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत तसेच काही जाचक कागदपत्रेही कमी केली आहेत.२१ ते ६५ वयोगटापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेच, पण आता महाराष्ट्राबाहेर असलेल्या माहेरवाशिणींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी या वयोगटातील महिलांमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन अर्जाबरोबरच ऑफलाइन अर्जही स्वीकारण्यात येत आहेत. जिल्ह्यात दोन्ही प्रकारे एकूण २ लाख २० हजार ७७ महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला