शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

संगमेश्वरात गोठ्यात सापडली बिबट्याची दोन पिल्ले, एक मृत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 5:58 PM

सुस्थितीत असलेल्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले. या पिल्लाच्या दिशेने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मौजे रांगव - धनगरवाडी येथील एका गोठ्यात दोन बिबट्याची पिल्ले आढळली. यातील एक पिल्लू जिवंत असून, दुसरे मृतावस्थेत आहे. वनविभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर जिवंत बिबट्याच्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले.संगमेश्वर तालुक्यातील  मौजे रांगव - धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या गवळवाडीमधील गोठ्यामध्ये बिबट्याची दोन पिल्ले दिसली. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांना माहिती मिळताच त्यांनी संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला यांना माहिती दिली. वनपाल तौफिक मुल्ला यांनी अधीनस्त कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी बिबट्याची दोन पिल्ले आढळली. त्यापैकी १ नर पिल्लू अर्धवट खाल्लेले मृतावस्थेत होते, तर दुसरे जिवंत होते. या मृत बिबट्याच्या पिल्लाचे देवरुख येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांच्याकडून विच्छेदन करून घेतले. सुस्थितीत असलेल्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले. या पिल्लाच्या दिशेने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.हे ट्रॅप कॅमेरे लावण्यासाठी मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे व त्यांच्या टीमने मदत केली आहे. विभागीय वन अधिकारी   दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन नीलख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. यापुढे वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आल्यास किंवा संकटात सापडल्यास त्यासंबंधी वन विभागाच्या १९२६ या हेल्प लाईनवर तसेच निम्न स्वाक्षरीकर्ता यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागातर्फेरत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग