रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़.मुंबई, ठाणे, पुणे व अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे़ मधुमेह व अन्य आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येते. मधुमेह असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.सुुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती़ त्यामध्ये एकाचा रुग्णाचा मृत्यूही झाला होता़ त्याचा इतिहास दुबईतून आल्याचा होता़ मात्र, त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेले ९५ टक्के रुग्ण मुंबई व अन्य जिल्ह्यातून आल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेले हे अन्य जिल्ह्यातूनच आलेले रुग्ण आहेत़सोमवारी जिल्हा रुग्णालयात २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला़ यामध्ये रत्नागिरी शहराजवळील शिरगांव येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून, त्याला मधुमेह व किडनीचा आजार होता़ तर दुसरा रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महिला (४२ वर्षे) असून तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात आणखीन दोघांचा मृत्यू, आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 5:45 PM
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़.
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात आणखीन दोघांचा मृत्यू, आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू४ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, कोरोनाबाधित एकूण ४८४ रुग्ण