रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया गाड्यांमध्ये दिवसेंदिवस चोºयांचे प्रमाण वाढत आहे. कोकणरेल्वेमधील दोन चोºयांमध्ये प्रवाशांचा रोख रकमेसह एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोकणरेल्वेतील वाढत्या चोºयांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. शुभम विनोदकुमार वर्मा (रा. माहियानवाली, गंगानगर, राजस्थान) हे दादर ते मडगाव असा प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांची गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आली असता, त्यांच्या बॅगेतून रोख १४,३०० रुपये अज्ञाताने लंपास केले. फिर्यादी वर्मा यांनी दोन अज्ञात व्यक्तींबद्दल संशय व्यक्त केला असून, हा गुन्हा दिनांक १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया कोचूवेली गाडीने फिर्यादी गीता भामभानी (रा. रानी सतीनगर, एस. व्ही. रोड, मालाड) या कोचूवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास करीत होत्या. या गाडीतील कोच क्रमांक एस - १ मधील आसन क्रमांक ७९ शयनयानमधून त्या प्रवास करीत होत्या. ही गाडी १५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आली असता, गीता यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या बॅगेतून रोख १० हजार रुपये आणि १६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केला. याप्रकरणी गीता भामभानी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
कोकण रेल्वेतील या दोन्ही चोºयांचा तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरु आहे. मागील तीन-चार महिन्यांमध्ये रेल्वेमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, रेल्वे प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहेत. या वाढत्या चोºयांमुळे कोकण रेल्वे प्रशासनही हैराण झाले आहे. मध्यंतरी रेल्वेत पेयामध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. मात्र, आता चोरट्यांनी थेट गाडीमधून प्रवाशांचा मुद्देमालच लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत.