गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील पर्यटक निवास येथील बोट क्लबची पाहणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नव्याने रुजू झालेल्या बॅटरी कारचे उद्घाटन करण्यात आले.
गणपतीपुळे येथील बोट क्लबच्या पाहणीसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत पर्यटक निवास येथे आले असता पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी कोकण विभाग दीपक माने यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी नव्याने पर्यटक निवास गणपतीपुळे येथे रुजू झालेल्या बॅटरी कारचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उदय सामंत यांनी गाडीची सवारीही गेली. तसेच बोट क्लबची पाहणी करून तेथील विविध साहसी जलक्रीडाची माहिती घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, येथील बांबू हाउस फारच सुंदर असून, येथील नयनरम्य परिसर पाहून पर्यटक भारावून जातील. या ठिकाणी विविध सेवा-सुविधा देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. तसेच प्रत्यक्षात जलक्रीडा व बोटिंग सुरू होईल त्यावेळी या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करू, असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. बी.एन. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, पंचायत समिती सदस्य गजानन पाटील, तहसीलदार शशिकांत जाधव, मालगुंड सर्कल सुरेंद्र कांबळे, प्रकाश जाधव, प्रकाश साळवे, आाप्पा धनावडे, जयगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक अस्मिता पाटील, मधुकर सरगर, पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी कोकण विभाग दीपक माने, वेळणेश्वरचे व्यवस्थापक सुभाष चव्हाण, अमित शेठ, सहाय्यक व्यवस्थापक रूपेश करंडे, संजय रामाणी, अतुल पाटील व पर्यटक निवास कर्मचारी उपस्थित होते.