शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकच, निवडणुकीत संस्था पॅनलचा उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 7:16 PM

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनलने विरोधी संस्था पॅनलचा एकतर्फी धुव्वा उडवला. अध्यक्षपदी केंद्रीय ...

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनलने विरोधी संस्था पॅनलचा एकतर्फी धुव्वा उडवला. अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी ४५५ मते मिळवून आणि कार्यवाह म्हणून सतीश शेवडे यांनी ३८२ मते मिळवून विजय संपादन केला. या दोन्ही पदांसह नियामक मंडळ सदस्य, विश्वस्त आणि सल्लागार असे सर्वच्या सर्व ३७ उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले.सोमवारी सकाळी संस्थेच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २. ३० वाजता मोजणी संपली.  कार्यवाह पदासाठी सतीश शेवडे व माजी कार्यवाह प्रा. माधव पालकर (२८३) यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत शेवडे यांनी त्यांचा ९९ मतांनी पराभव केला. सहकार्यवाह पदासाठी प्रा. श्रीकांत दुदगीकर (४८८) आणि नरेंद्र तथा नाना पाटील (१७७) यांच्यातील लढतीत प्रा. दुदगीकर यांनी एकतर्फी विजय मिळवला.संस्था पॅनेलच्या रमेश कीर, भाऊ वैद्य यांच्यासमवेत सर्व उमेदवारांना पराभव स्वीकाराला लागला. नियामक मंडळाच्या सभेमध्ये कार्याध्यक्षपदाची निवड पुढील दोन दिवसांत करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. मकरंद साखळकर यांनी काम पाहिले. या कामासाठी ६० कर्मचारी, प्राध्यापक नियुक्त करण्यात आले होते.

उर्वरित निकाल असा (कंसामध्ये मिळालेली मते) :उपाध्यक्ष- ॲड. विलास पाटणे (५००), डॉ. मुकुंद जोशी (४८८), ॲड. प्रदीप नेने (४६४).विश्वस्त- रवींद्र तथा मुन्ना सुर्वे (४५०), लिलाधर जोशी (४३८), विवेक भावे (३५०).सल्लागार मंडळ- डॉ. श्रीराम केळकर (५३७), सीए वरदराज पंडित (५१५), डॉ. सुजय लेले (५१३), निनाद जोशी (५०७), दत्तात्रय तथा नाना शिंदे (५०१), भारत फडके (५०१), अनघा चितळे (४९१), उमेश आपटे (४७९), संतोष गुरव (४६०) आणि स्वप्नील सावंत (४५३).नियामक मंडळ- ॲड. प्राची जोशी (४९८), डॉ. चंद्रशेखर केळकर (४७२), सीए मंदार गाडगीळ (४६५), राजेंद्र मलुष्टे (४६४), मनोज पाटणकर (४४८), डॉ. संजय केतकर (४४६), डॉ. कल्पना मेहता (४४३), हेमंत उर्फ विजय देसाई (४३८), सचिन वहाळकर (४३५), ॲड. विजय साखळकर (४२०), ॲड. अशोक कदम (४१८), सुहास पटवर्धन (४१६), शिल्पा पटवर्धन (४१४), आनंद देसाई (३९९), सीए उमेश लोवलेकर (३९१), ॲड. अविनाश तथा भाऊ शेट्ये (३९१), भरत ओसवाल (३८५) आणि महेश नवेले (३५९).

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी