चिपळूण : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तोंडावर आलेला पावसाळा, त्यामुळे शेतकऱ्यांना भात बी-बियाणे खरेदी करण्यासाठी मदत व्हावी, या प्रामाणिक उद्देशाने खेर्डी ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया उतेकर व संतोष उतेकर यांनी देऊळवाडी येथील गरजू शेतकरी बांधवांना आर्थिक मदत केली आहे.
यापूर्वीही लॉकडाऊनमध्ये त्यांनी ग्रामस्थांना धान्य, किराणा वस्तू आदी वस्तू वाटप केले असून, काही ठिकाणी जमेल तसं स्वखर्चाने विकासकामेही केली आहेत. त्यानंतर, आता शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी अर्थसाहाय्य केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्या उतेकर व संतोष उतेकर यांच्यासोबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हासंघटक संतोष सुर्वे, माजी सरपंच रवींद्र फाळके, उपविभागप्रमुख यशवंत लाड, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ फाळके, शाखाप्रमुख अनिल शिंदे, मंगेश पवार, महेंद्र फाळके, किशोर फाळके, अनिल फाळके, गोविंद फाळके, प्रकाश फाळके, संदीप हटकर व ग्रामस्थ उपस्थित होते.