फोटो २७ महावितरण फोल्डरमध्ये सेव्ह आहे.
कॅप्शन : महावितरण कंपनीच्या कार्यालयात आयोजित लसीकरण शिबिरावेळी प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक वैभव थोरात, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, ऋषीकेश लोखंडे, कामगार अधिकारी आप्पासाहेब पाटील.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रात्री-बेरात्री वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाकाळात कोणत्याही ठिकाणी जावे लागते. विशेषत: सध्या लसीकरण मोहिमेमध्ये ‘कोल्ड चेन’ सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीने विशेष नियोजन केले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लसीकरण मंगळवारी आयोजित करण्यात आले होते.
सातत्याने धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत असल्याने कोकण परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निदर्शनास ही परिस्थिती आणून दिल्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी डॉ. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लसीकरण शिबिराला मंजुरी दिली आणि त्यानुसार मंगळवारी महावितरण कंपनीच्या कार्यालयात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराच्या आयोजनासाठी उपमहाव्यवस्थापक वैभव थोरात, प्रभारी कामगार अधिकारी आप्पासाहेब पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता स्थापत्य ऋषीकेश लोखंडे यांनी साहाय्य केले. डॉ. जयस्वाल आणि त्यांच्या टीमने एकूण ३०० कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस दिली. अशाच प्रकारे गाव खेड्यातील वीज कामगारांसाठी प्राधान्याने लसीकरण व्हावे, अशी मागणी महावितरणतर्फे करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जाखड यांनी याबाबत लसीच्या उपलब्धतेनुसार सर्वांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.