रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील हातीसकर वाडी येथे लाेकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे वनराई बंधारा बांधण्यात आला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा :
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामरावजी पेजे (कला, वाणिज्य आणि विज्ञान) वरिष्ठ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामपंचायत शिवार, आंबेरे यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारे बांधण्यात आले.
ग्रामपंचायत शिवार आंबेरेतर्फे सार्वजनिक नळपाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या सार्वजनिक विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने हातीसकरवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने शिवार आंबेरे व ग्रामपंचायतीचे सरपंच राजन रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेतला. याप्रसंगी शिवार आंबेरेचे सरपंच राजन रोकडे म्हणाले की, या बंधाऱ्यामुळे आमच्या गावात यावर्षी निश्चितपणे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही.
हा वनराई बंधारा बांधण्यावेळी सरपंच राजन रोकडे, समीर मयेकर, सागर लाखण, औदुंबर पारकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राकेश आंबेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नीतेश केळकर, प्रा. संकेत शिंदे, प्रा. ओंकार लिंगायत, प्राध्यापिका मृण्मयी मयेकर, प्राध्यापिका अनुष्का लिंगायत, प्राध्यापिका शुभांगी बंडबे आणि प्राध्यापिका कल्पना मेस्त्री यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.