कोंढे (ता. चिपळूण) येथील रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभाग घेतला हाेता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे : कोंढे (ता. चिपळूण) येथील रिगल कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले हाेते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने स्पर्धांमध्ये रंगत आली हाेती. वक्तृत्व स्पर्धेमध्ये वैष्णवी सावंत हिने प्रथम, अर्चना कदम हिने द्वितीय व अक्षया मोहिते हिने तृतीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धेमध्ये ऋतुजा बने हिने प्रथम क्रमांक, साक्षी मोरे व अक्षता घोलप हिने द्वितीय क्रमांक, ऐश्वर्या शिगवण, मृणाल रूमाडे, वैष्णवी सावंत यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. वेशभूषा स्पर्धेमध्ये अल्ताफा तौसाळकर हिने प्रथम, श्वेता जाधव हिने द्वितीय व धनश्री जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाला कोंढे निर्मल ग्रामपंचायतीच्या सरपंच माधवी कुळे, उपसरपंच हसन खान, ग्रामपंचायत सदस्य वैशाली मूकनाक, ऋतुजा करंजकर, सुनीता तटकरे, बचतगट सदस्या रोशनी कुळे, गायत्री तांबीटकर, ग्रामसेवक मंगेश पांचाळ, रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ.सुमिता शिर्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बीसीए महाविद्यालयाच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांनी केले.