रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरीच्या २०२१-२२ च्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच ऑनलाइन आयोजित करण्यात आला. विजय पवार यांनी नवीन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सचिव म्हणून जयेश काळोखे, तर खजिनदार म्हणून प्रकल्प आराध्ये यांनी सूत्रे स्वीकारली.
रत्नागिरीच्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब रत्नागिरीच्या ६४व्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नुकताच झाला. यावेळी विजय पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून आपल्या कामाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली. सचिव म्हणून जयेश काळोखे तर खजिनदार म्हणून प्रकल्प आराध्ये यांनी सूत्रे स्वीकारली.
या कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर जयंतीलाल जैन इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पनवेल रोटरी क्लबचे सदस्य आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दीपक पुरोहित हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. दीपक पुरोहित यांनी रोटरीचे सेवाकार्य आणि महत्त्व पटवून दिले. रोटरी सदस्यांनी कशा प्रकारे समाजोपयोगी कार्य केले पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले. नवनियुक्त सचिव जयेश काळोखे यांनी आभार मानले.
नीलेश मुळ्ये यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. देवदत्त मुकादम यांनी सर्व ऑनलाइन मीटिंगच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली.