शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

खेडमध्ये तेरा दुकाने फोडली

By admin | Published: July 14, 2014 12:09 AM

आठजणांचीच फिर्याद

खेड : शहरातील तब्बल १३ दुकाने चोरट्यांनी फोडली असून, तब्बल पावणेदोन लाखांचा ऐवज लांबविला आहे. काल, शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी या चोऱ्या केल्या. याप्रकरणी फक्त आठच जणांनी खेड पोलिसांत चोरी झाल्याची फिर्याद नोंदविली आहे. गुहागरमध्ये सात दुकाने फोडल्यानंतर आता आपला मोर्चा चोरट्यांनी खेड शहराकडे वळविला आहे.शिवाजीनगर येथील सर्फराज पांगारकर हे आपले दुकान रात्री नेहमीप्रमाणे बंद करून घरी निघून गेले. आज, रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना आपल्या एस. एम. इलेक्ट्रिकलच्या बंद शटरची कुलपे तुटलेली आढळली. त्यांनी पाहणी केली असता २७०० रुपये किमतीच्या मोबाईलच्या बॅटऱ्या चोरल्याचे लक्षात आले. तसेच शिवाजीनगर येथील समीर सिकंदर नांदगावकर यांच्या सानिया लेडीज कलेक्शन या दुकानाचे शटर तोडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला आहे. शेजारी असलेल्या असिम अहमद खतीब यांच्या नकी स्पेअर्स पार्टस् या दुकानाचे शटर तोडून १४०० रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. तसेच शेजारीच असलेल्या अश्फाक इब्राहिम देसाई यांच्या देसाई ट्रेडर्स अ‍ॅण्ड प्लायवूड हे दुकानदेखील फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला; परंतु ते अयशस्वी ठरले. त्यानंतर चोरट्यांनी समर्थनगर येथील एमएसईबी कार्यालयानजीक असलेल्या शेखर महादेव शेठ यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एचएच-०८-यू-८२०८)देखील चोरून नेली. तेथून चोरट्यांनी शहरातील तीनबत्ती नाका येथील मुकादम कॉम्प्लेक्स येथील नासीर शेख यांचे झेरॉक्स सेंटर व मोबाईल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी ५३ हजार रुपयांची रोकड लांबविली. त्याच कॉम्प्लेक्समधील आकाश एंटरप्रायझेस हे अतुल शेठ यांचे दुकान फोडून चोरट्यांनी ७५०० रुपये रोख, तर यासीन मलिक शेख यांचे सिझन जेंटस् वेअर हे टेलरिंग दुकान फोडले व १० हजार रुपये रोख रक्कम लांबविली. (प्रतिनिधी)