चिपळूण : दिवाळीसाठी गोरगरिबांना स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आलेली २४० क्विंटल चणाडाळ येथील शासकीय गोदामात पडून आहे. या विषयीची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना मिळताच तातडीने पुरवठा विभागाला या डाळीचे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत.शासनाकडून दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळीसारख्या वस्तुंचा पुरवठा मुबलक स्वरुपात केला जातो. स्वस्त व योग्य दर्जाची चणाडाळ गोरगरिबांना मिळावी, या उद्देशाने त्या त्या भागात डाळीचे वितरण केले जाते. मात्र, यावेळी शासनाकडूनच काहीशी उशिरा डाळ पुरवठा करण्यात आल्याने ऐन दिवाळीत रेशन दुकानांवर डाळ वितरित करता आली नाही, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.आता दिवाळीचा मुख्य सण आटोपल्यानंतर या डाळीच्या वितरणासाठी प्रशासनाची लगबग सुरु झाली आहे. याविषयी तहसीलदार सूर्यवंशी यांनी गंभीरपणे दखल घेत पुरवठा विभागाला तातडीने डाळीचे वितरण करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार त्या त्या परमीटधारक विक्रेत्यांना डाळ विक्रीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
दिवाळीसाठी आलेली चणाडाळ अजून गोदामात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:33 AM
दिवाळीसाठी गोरगरिबांना स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आलेली २४० क्विंटल चणाडाळ येथील शासकीय गोदामात पडून आहे. या विषयीची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना मिळताच तातडीने पुरवठा विभागाला या डाळीचे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ठळक मुद्देदिवाळीसाठी आलेली चणाडाळ अजून गोदामातसण आटोपल्यानंतर डाळीच्या वितरणासाठी प्रशासनाची लगबग