शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रत्नागिरीत पाकीटमाराची धुलाई, आरोपीला अटक : २०,६०० रुपये हातोहात केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:28 PM

रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शर्टाच्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा चंद्रेश राम (२०, रा. इंदोर, मध्यप्रदेश) या पाकिटमाराने हातोहात लंपास केल्या.

ठळक मुद्देरत्नागिरीत पाकीटमाराची धुलाई, आरोपीला अटक २०,६०० रुपये हातोहात केले लंपास

रत्नागिरी : शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शर्टाच्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा चंद्रेश राम (२०, रा. इंदोर, मध्यप्रदेश) या पाकिटमाराने हातोहात लंपास केल्या.

पळून जाताना या पाकीटमाराला नागरिकांनीच पकडले. त्याला चांगलाच प्रसाद देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या सराईत चोरट्याकडील रोख रक्कम घेऊन त्याचा दुसरा साथीदार पसार झाला. मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी चंद्रेशला पोलिसांनी अटक केली.फिर्यादी वसंत पांडुरंग भिंगार्डे (६६, रा. बंदररोड, रत्नागिरी) हे शहरातील विठ्ठल मंदिरजवळील रजनीकांत या दुकानाजवळ उभे होते. त्यावेळी पाठीमागून आलेला पाकीटमार चंद्रेश याने भिंगार्डे यांच्या उजव्या खांद्यावर नायलॉनची पिशवी ठेवली. त्याचवेळी त्यांच्या शर्टाच्या डाव्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा लंपास केल्या. त्याचे काही अन्य साथीदारही तेथे होते.

ते रक्कम घेऊन पसार झाले. मात्र, खिशातील पैसे लंपास झाल्याचे भिंगार्डे यांच्या लक्षात आल्याने ते चोर-चोर म्हणून जोरात ओरडले. त्यामुळे पळून जाणाऱ्या पाकीटमार चंद्रेशला तेथील नागरिकांनी पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. याप्रकरणी पैसे घेऊन पसार झालेल्या तीन संशयितांचा शहर पोलीस शोध घेत असून, चंद्रेशची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrimeगुन्हा