आॅनलाईन लोकमतअडरे : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई वाढू लागली आहे. चिपळूण तालुक्यात पाणी टंचाईच्या गाव व वाड्यांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. आतापर्यंत ११ गावातील २८ वाड्यांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी अर्ज दिले आहेत. त्यातील ६ गावातील १२ वाड्यांना पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग व तहसीलदार कार्यालयात टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचे अर्ज येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे वाड्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोंडमळा धनगरवाडी, अडरे धनगरवाडी, रिक्टोली इंदापूरवाडी, मावळतवाडी, बौध्दवाडी, देऊळवाडी, मधलीवाडी, तिवरे गावातील भटवाडी, राळेवाडी, गावठाण, गुरववाडी, चोरगेवाडी, बौध्दवाडी, गाणे धनगरवाडी, टेरव गावातील दत्तवाडी, धनगरवाडी, सावर्डे धनगरवाडी, कामथे खुर्द धनगरवाडी, कळंबट केरे घवाळगाव येथील सुतारवाडी व धनगरवाडी, केतकी बौध्दवाडी, नांदिवसे स्वयंदेव, तळसर गावातील म्हादेवाडी, कदमवाडी, खालचीवाडी, निवेवाडी, जाड्येवाडी, जाधववाडी या वाड्यांतून टँकरने पाणी पुरावठा करावा या मागणी अर्ज दाखल झाले आहेत. (वार्ताहर)
चिपळूण तालुक्यात ११ गावात पाणी टंचाई
By admin | Published: April 17, 2017 6:23 PM