शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

चिपळुणात पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकरवर मदार, उन्हाची दाहकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 7:06 PM

तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात नाही

संदीप बांद्रेचिपळूण : उन्हाची दाहकता अधिकच वाढत चालली आहे. परिणामी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६ गावे आणि ८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे या गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळपाणी पुरवठा योजनांच्या उद्भव विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने विहिरी कोरड्या पडतात. परिणामी संबंधित गावांना टँकरमधून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सर्वप्रथम टंचाईचा तडाखा हा उंच डोंगरावर वसलेल्या धनगरवाड्यांना बसतो आहे.धनगरवाड्यांसाठी पाणी योजना राबवल्या असल्या तरी तेथील पाणीसाठा कमी होत असल्याने टंचाईची झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील अडरे, अनारी, टेरव, कोंडमळा, सावर्डे, गुढे या ६ गावांतील ८ वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागतो आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून पाणी पुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.दसपटी विभागातील तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. यावर्षी पावसाळ्यापूर्वी धरण दुरुस्ती होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे सावर्डेसाठी असलेल्या धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. परिणामी येथील काही वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. रामपूर तांबी धरणाला गळती लागल्याने गेल्या काही वर्षातील या धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांनाही टंचाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.पाणी टंचाईवर कायमचा तोडगा निघण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावोगावी कोट्यवधी खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत. या पाणी योजनांच्या पूर्तीनंतर टंचाईला आळा बसण्याची आशा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी