शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

Waterfalls in Konkan: पर्यटकांना खुणावतोय सावडावचा धबधबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 12:48 IST

धबधब्याजवळ पर्यटकांसाठी चेजिंग रूम, वॉश रूम आणि वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

- निकेत पावसकर, तळेरे -सिंधुदुर्गकाेकणातील निसर्ग सौंदर्याची अनेकांना नेहमीच भुरळ घातलेली आहे. त्यामुळेच वर्षानुवर्षे पावसाळी आणि उन्हाळी पर्यटनासाठी असंख्य पर्यटक कोकणातील विविध स्थळांना भेट देऊन आनंद लुटतात. सध्या पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून, असंख्य ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे तो अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी पर्यटक सुट्टीत मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत. सध्या हे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत.कोकणातील निसर्ग, धबधबे, समुद्र किनारे, किल्ले, विविध धार्मिक स्थळे हे सर्व अद्भुत आणि अद्वितीय असे पाहण्यासारखे दृश्य असंख्य पर्यटक आवर्जून पाहतात. जून महिना पूर्णतः तसा पाहिल्यास कोरडाच गेला. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोर धरला आणि खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून जवळच असलेला सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. त्यामुळे सुट्टीत पर्यटक या धबधब्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागले असल्याचे चित्र आहे.अल्पावधीत महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध झालेला कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा प्रवाहित होण्याची वाट पर्यटक पाहत असतात. यावर्षी पुन्हा वर्षा पर्यटन सुरू झाले असून, जिल्ह्यासह राज्य,  परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी आता सावडाव येथे दिसू लागली आहे. कणकवलीपासून अवघ्या १६ किमी अंतरावर तर मुंबई-गोवा महामार्गावरून ६ किमी अंतरावर असलेला सावडाव धबधबा अनेकांना आकर्षित करतोय. धबधब्याजवळील मोकळी प्रशस्त जागा सुरक्षितता यामुळे हा धबधबा आणि निसर्ग सौंदर्य सर्वांनाच मोहित करते.यावर्षी मान्सून उशिरा सक्रिय झाला. मात्र, सावडाव परिसरात दमदार पडणाऱ्या पावसामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनासाठी सावडावकडे शनिवार, रविवार वर्षा पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. हिरवीगार झाडी, हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा धबधबा पाहताना पर्यटकांना अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळतो. जिल्ह्यातील आंबोलीनंतर वर्षा पर्यटनासाठी चांगला धबधबा असल्यामुळे जिल्ह्यासह इतर राज्यातून अनेक पर्यटक मोठ्या संख्येने सावडावला पसंती देतात. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.या धबधब्याजवळ पर्यटकांसाठी चेजिंग रूम, वॉश रूम आणि वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, विशेषतः सुट्टीच्या दिवसात पोलिस बंदोबस्त असेल तर सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि उत्साही पर्यटकांना हाताळण्यासाठी सोयीचे होऊ शकेल. अनेकदा बेभान झालेल्या पर्यटकांना रोखणे शक्य होत नाही आणि त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याचा संभव असतो.

डोंगर पठारावरून पसरट कड्यावरून खाली कोसळणारा, निसर्गरम्य वातावरणात आनंदाचे उधाणच आलेला सावडाव धबधबा कोसळू लागला आहे. त्यामुळे धबधब्याखाली अनेक पर्यटक स्नान करण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावर्षी जून अखेरपासून ते सप्टेंबर काळात सावडाव धबधब्यावर पर्यटकांची संख्या दररोज वाढण्याची शक्यता आहे. रविवार व सुट्टीच्या दिवसांसह अन्य दिवशीही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येथे हजेरी लावतात. या धबधब्याकडे जाणारा मार्ग अलीकडे रुंद केल्याने निसर्गाच्या कुशीतून सुखकर प्रवास करण्याचा आनंद मिळतो. स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुट्टीच्या दिवशी किमान२ ते ३ हजार पर्यटक या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यामुळे इतर सुविधांच्या बाबतीत प्रशासनाने आणि शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

सावडावकडे असे जा

  • कणकवलीवरून सावडाव धबधबा अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील सावडाव फाट्यावरून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
  • या धबधब्याकडे जायचे म्हणजे स्वतःच्या वाहनाशिवाय पर्याय नाही. अगदी आजूबाजूच्या निसर्गाचा अनुभव घेत या धबधब्याकडे जाता येते.

खासगी वाहन व्यवस्थायाठिकाणी सर्व जागा खासगी असल्याचे समजले. याच खासगी जागेत वाहने लावण्यासाठी वाहनतळ करण्यात आले आहे. त्यासाठी दुचाकीला २० रुपये आणि चारचाकी वाहनासाठी रुपये ४० असे शुल्क आकारले जाते. तर काही दुकानेही या परिसरात थाटलेली आहेत.

परजिल्ह्यातील सर्वाधिक पर्यटकयाठिकाणी दरवर्षी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील पर्यटकांची वाढती संख्या आहे. मात्र, अशा पर्यटन स्थळावर येणाऱ्या बेजबाबदार पर्यटकांच्या वागण्यामुळे अशा स्थळांच्या सुरक्षेसह सौंदर्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतो. पर्यटक मोठ्या संख्येने येतात, मात्र जाताना सर्व कचरा इतरत्र टाकलेला असतो. यासाठी त्याठिकाणी कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला पाहिजे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन