शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

Waterfalls in Konkan: पावसाळी पर्यटनात भाव खाऊन जाणारा ‘सवतकडा’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:29 PM

‘स्लेट टाइप’ टप्पे त्यावरून पडणारे पाणी आणि त्याचे सौंदर्य बघून आपण परदेशात तर नाही ना असाच हाेताे भास

- विनोद पवार, राजापूरनिसर्गाच्या कुशीत चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला राजापूर तालुक्यातील चुनाकोळवणचा ‘सवतकडा धबधबा’ आता राज्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूरहून मुंबईकडे जाताना १२.५० किलाेमीटरवर डाव्या बाजूला शिवणे हा रस्ता जातो. तिथून ६.५० किलाेमीटर उजव्या बाजूला ४ किलाेमीटर अंतरावर चुनाकोळवण हे गाव आहे. तेथे गाडी लावून १ किलाेमीटर निसर्गरम्य वातावरणातून चालत गेल्यानंतर हा धबधबा दृष्टीस पडताे.मंदरूळ, वाटूळ, चुनाकोळवण परिसरात रांगोळीचा दगड मोठ्या प्रमाणात आहे. ‘स्लेट टाइप’ दगडामुळे, दगडाचे वेगवेगळे टप्पे तयार होतात. त्यावरून पडणारे पाणी आणि त्याचे सौंदर्य बघून आपण परदेशात तर नाही ना असाच भास हाेताे. हा संपूर्ण भाग डोंगरदऱ्यांचा असल्याने एकाच ओढ्यावर ३-४ ठिकाणी छोटे-मोठे धबधबे आढळतात.राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील ‘सवतकडा धबधबा’ हळूहळू सर्वांनाच परिचित हाेऊ लागला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी दूरदूरवरील पर्यटक या ठिकाणी येत आहेत. गावामधील सुतारवाडी येथे असणाऱ्या ‘सवतकडा धबधब्या’च्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा-पुन्हा या ठिकाणी येण्याची ओढ लागतेच. त्यामुळे जूनपासून ते अगदी गणपती, दिवाळीपर्यंत या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.भरपावसात अंगाला येणारा घामाचा दर्प, शिणवटा हा निसर्ग पाहत असताना कुठल्या कुठे दूर पळून जातो, ते कळतच नाही. मात्र, धबधब्याकडे उतरत असताना पाय घसरून पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे उत्साहाबराेबरच सावधानता हवीच.  धबधब्याजवळ पोचताच शुभ्र जलधारा पाहून आपलं मन मोहरून जातं.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन