रत्नागिरी : सागरी माशांमध्ये अत्यंत आकर्षक मासा म्हणून घोडामाशाची ओळख आहे. परंतु, आता हा मासा नामशेष होण्याचा मार्गावर असून, या माशाच्या जातीचे संवर्धन व जतन होणे गरजेचे आहे. मात्र, हा मासा पाळण्यावर शासनाने बंदी घातली आहे. चिनी पारंपरिक औषधांमध्ये या माशांचा वापर होत असून, हा मासा अवैधरित्या तेथे पाठवला जातो. त्यामुळे या घोडामाशाचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. समुद्रात जास्त क्षारता असलेल्या पाण्यात आढळणारा मासा म्हणजे ‘घोडामासा’. सागरी घोडामासा हा प्रवाळाच्या बेटांमध्ये वस्ती करतो. समुद्रातील सर्वांत आकर्षक मासा म्हणून घोडामाशाची गणना होते. हा मासा भारत, चीन, आॅस्ट्रोलिया, जपान, आदी देशांमध्ये आढळून येतो. गेल्या काही वर्षांपासून या माशांची अवैध तस्करी होत असल्याने हा मासा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असलेला हा मासा वाचविणे ही काळाची गरज आहे. घोडामासा हा दिसायला अत्यंत आकर्षक असतो. या माशाच्या विविध ५४ जाती विविध देशांमध्ये आढळून येतात. परंतु, सध्या हा मासा अंत्यत दुर्मीळ होत चालला आहे. हा मासा सुमारे २०० ते ५०० अंडी देतो. परंतु, यामधून येणारी बहुतांशी पिल्ले ही अतिशय सुक्ष्म असल्याने मरण पावतात. त्यामुळे दिवसेंदिवस ही जात दुर्मीळ होत चालली आहे. परंतु, आता यावर युध्दपातळीवर संशोधन सुरू असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली. परंतु, हा घोडामासा आता संकटात सापडला असून, त्यामागचे मुख्य कारण म्हणजे पारंपरिक चिनी औषधांमध्ये सुकवलेल्या घोडामाशाची पावडर व त्यापासून बनवलेल्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे या घोडामाशांची तस्करी मोठ्या प्रमाणात होऊन हा मासा अवैधरित्या चीनमध्ये पाठवला जातो. या माशाची तस्करी थांबविणे ही काळाची गरज आहे. त्यातूनच या घोडामाशांचे संर्वधन व जतन होईल. (वार्ताहर) जास्त मागणी : जास्तीत जास्त १४०५ पिलांना जन्म घोडामासा हा ०.५ ते ८ मीटर उंचीच्या पाण्यामध्ये आढळतो. हा मासा आता खूप दुर्मीळ होत चालला आहे. चीनमध्ये त्याला खूप मागणी आहे. प्रवाळ व वनस्पतींमध्ये या माशांचे वास्तव्य असते. प्रजनन काळात या माशाच्या अंड्यांचा आकार १.८ मिलिमीटर इतका असतो. जास्तीत जास्त १४०५ पिलांना या माशाने जन्म दिल्याचा दाखला सापडतो. घोडामांशावर बंदी नैसर्गिक साधनसंपत्तीचे खरे उदाहरण म्हणजे घोडामासा होय. हा मासा जास्त क्षारता असलेल्या पाण्यात आढळतो. सध्या हा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो पाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा मासा रत्नागिरीच्या मत्स्यालयात उपलब्ध आहे.
घोडामासा नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Published: September 11, 2016 11:11 PM