शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

"विकासासाठी दिल्लीचं तख्त गाठू, पण महाराष्ट्र झुकणार नाही" आदित्य ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 10:20 PM

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू असून, कोकणासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे

रत्नागिरी - विकासकामासाठी दिल्लीच तख्त गाठू परंतु, महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही, महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचा  स्पष्ठ इशारा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला आहे .

महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याचे काम भाजपा कडून होत आहे , परंतु सरकार चांगले निर्णय घेत आहे व आज पर्यंत कधी नव्हे ते या सरकार कडून चांगले काम सुरू असल्याचे आदित्य ठाकरे दापोलीतील शिवपुतळा अनावरण सोहळ्याप्रसंगी म्हणाले. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दापोलीतील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले याप्रसंगी बोलतानाछत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून ,या सरकारच्या माध्यमातून कोकणातीलच नव्हे तर राज्यातील गड किल्ल्यांची पुनर्बांधणी केली जात आहे ,कोकणातील अनेक किल्ले विकसित केले जातील, महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे, त्यामुळे शिवरायांच्या ऐतिहासिक किल्ल्याना गतवैभव प्राप्त करून देऊ व आम्ही त्याचे पवित्र  जपण्याचे काम नक्की करू, अशी मी आपल्याला ग्वाही देतो वचन देतो अशा प्रकारचे शब्द राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दापोली येथे शिव पुतळा अनावरण सोहळ्याप्रसंगी  दिले.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू असून, कोकणासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे ,महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड किल्ल्या साठी 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले ,त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोकणातील सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे, त्यासाठी समिती नेमण्यात आली असून समितीच्या माध्यमातून किल्ले संवर्धनाचे काम केले जात आहे, किल्ले संवर्धनासाठी वेळप्रसंगी दिल्लीकडे पाठपुरावा करावा लागेल तो सुद्धा करू, परंतु कोणत्याही परिस्थितीत किल्ले संवर्धन केले जाईल, कोकणातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत कोकणात रोजगार निर्मिती कशी होईल यादृष्टीने पाठपुरावा केला जात आहे महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षाचे बैठक घेऊन कोकणातील शाश्वत पर्यावरण पर्यटन देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत, महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे हाती घेण्यात आली असून कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

दापोली आमदार योगेश कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील किल्ल्यांचे संवर्धन व्हावे अशी मागणी आदित्य ठाकरे व आदिती तटकरे यांच्याकडे केली रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली, त्याच बरोबर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कोकणातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी कोकणातील पर्यटन स्थळे विकसित केली जातील शिवरायांचे गड किल्ले संवर्धित केले जाऊन चांगले पर्यटन स्थळ म्हणून जगासमोर येथील असे सांगितले तसेच पर्यटन मंत्री या नात्याने कोकणातील पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

कोकणातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी व कोकणातील पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून  सागरी महामार्गाला महा विकास आघाडी सरकारकडून गती दिली जात आहे ,त्यामुळे भविष्यात कोकणातील पर्यटन स्थळे आपोआपच जोडले जातील ,व लोकांना रोजगार उपलब्ध होईल असे खासदार सुनील तटकरे म्हणाले. 

छत्रपती शिवरायांच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत खासदार सुनील तटकरे आमदार भास्कर जाधव आमदार योगेश कदम आमदार राजन साळवी माजी आमदार सूर्यकांत दळवी माजी आमदार संजय कदम दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ममता मोरे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे आदी मान्यवर उपस्थित होते

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना