अरुण आडिवरेकर ।रत्नागिरी : व्हॉट्सअॅपचा डीपी आणि स्टेटस् बदलण्याची वेगळीच ह्यक्रेझह्ण अनेकांमध्ये पाहायला मिळते. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने विविध पक्षांच्या चाहत्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपचा डीपी राजकीय पक्षांचे चिन्ह किंवा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांचा फोटो ठेवण्यास पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे.निवडणुकीचा प्रचार अजूनही शिगेला पोहोचलेला नाही. गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही ऐकायला मिळत नाहीत. जाहीर प्रचार सभांमधून होणारे भाषण केवळ एकमेकांवरील टीकेपुरतेच मर्यादित राहिले आहे. त्यातून जहरी टीका अजूनतरी कोणत्या पक्षाकडून होताना दिसत नाही. अजूनही प्रचारामध्ये जोश असल्याचे दिसत नाही. उन्हाच्या कडाक्यामुळे अनेकजण सकाळी लवकर आणि सायंकाळनंतरच प्रचारासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. घरोघरी पक्षांची पत्रके वाटून उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. मात्र, अद्याप मोठ्या राजकीय नेत्यांच्या सभांचे प्रमाण कमीच दिसत आहे. त्यामुळे होणारा प्रचार संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे.व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून निवडणुकीचा ज्वर चढत असताना मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तसे अनेकांनी आपल्या व्हॉट्सअॅपच्या डीपीवर पक्षाचे चिन्ह ठेवण्यास सुरूवात केली आहे. काहींनी आपल्या उमेदवाराचाच फोटो ठेवला आहे, तर अनेकांनी मतदानाची तारीख ठेवून मतदानाविषयी जागृती केल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीचा ज्वर चांगलाच रंगात आला आहे.सोशल मीडियावर निवडणुकीचा ज्वर मात्र चांगलाच चढल्याचे दिसत आहे. व्हॉट्सअॅपवर विविध ग्रुप तयार करून त्यावर राजकीय चर्चा जोरात झडत आहेत. त्यातच सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचारावरही निवडणूक आयोगाचे लक्ष राहणार असल्याने कोणीही आपल्या पक्षाचा खुलेआमपणे प्रचार करताना दिसत नाही. पण राजकीय मुद्द्यावरून दिवसभर जोरदार चर्चा मात्र सुरूच असतात. पक्षाची ध्येय धोरण कशी बरोबर आहेत, आपल्याच पक्षाचा नेता कसा योग्य आहे, यावरच आरोप - प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पण वाद टाळले जात आहेत.डीपी बदलण्याचे वेडव्हॉट्सअॅप वापरणाºया तरूणांमध्ये डीपी बदलण्याचे वेड खूपच आहे. अनेकांना तर वारंवार डीपी बदलण्याची सवयच असते. कधी स्वत:चा तर कधी आवडत्या व्यक्तिचा फोटो ठेवण्यात येतो. व्हॉटस्अॅपवरील स्टेटसवरही निवडणुकीचाच ज्वर दिसत आहे. पोस्टर, बॅनर बरोबर प्रचार गीतही वाजत आहेत. निवडणुकीत मात्र अनेकजण राजकीय पक्षांच्या बॅनरचा फोटो ठेवत आहेत.
Lok Sabha Election 2019 व्हॉट्सअॅपह्णच्या ह्यडीपीह्णवर चढतोय निवडणुकीचा ज्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 3:34 PM
व्हॉट्सअॅपचा डीपी आणि स्टेटस् बदलण्याची वेगळीच ह्यक्रेझह्ण अनेकांमध्ये पाहायला मिळते. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने विविध पक्षांच्या चाहत्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपचा डीपी राजकीय पक्षांचे चिन्ह किंवा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या
ठळक मुद्दे- सोशल मीडियावर अधिक सक्रियता-- ह्यडीपीह्णसाठी खास बॅनरविविध ग्रुपवर उमेदवारांच्या प्रचाराऐवजी राजकीय चर्चेला उधाण