रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील गाैतमी नदीपात्रात पुन्हा आठवडाबाजार सुरू करण्यात आला आहे. (छाया : दिनेश कदम)
लाेकमत न्यूज नेटवर्क
पावस : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला आठवडाबाजार बुधवार (३१ मार्च) पासून ग्रामपंचायतीच्या परवानगीने सुरू करण्यात आला आहे.
काेराेनामुळे सर्व आठवडाबाजार बंद ठेवण्यात आले आहेत. आठवडाबाजार बंद ठेवल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळत नव्हता. त्यातच, परजिल्ह्यातून येणारा भाजीपालाही येणे बंद झाले हाेते. पावस येथील आठवडाबाजाराबाबत ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन पुन्हा सुरू करण्यात आला आहे. आठवडाबाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला काेराेनाबाबतचे सर्व नियम पाळण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंग ठेवून हा बाजार सुरू करण्यात आला आहे. या बाजारामुळे व्यापारी व परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावस येथील गौतमी नदीच्या पात्रामध्ये आठवडाबाजार सुरू करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आठवडाबाजारकडे लोकांनी पाठ फिरवली हाेती.