हातखंबा : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कापडगाव क्रमांक १ चा विद्यार्थी राज सचिन पेजे याला व्हिलचेअर प्रदान करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शेखर कोवळे, झोन चेअरमन प्रमोद खेडेकर, सुनीलदत्त देसाई, रत्नागिरी क्लबच्या अध्यक्ष ॲड. शबाना वस्ता, हातखंबा क्लबचे अध्यक्ष मनोज खानविलकर, कापडगाव उपसरपंच सपना पेजे, पोलीस पाटील मुग्धा कांबळे उपस्थित होते. राज पेजे हा विद्यार्थी आपल्या अपंगत्वावर मात करत शिक्षण पूर्ण करत आहे. या विद्यार्थ्याची गरज आणि पालकांची मेहनत मनोजकुमार खानविलकर यांच्या लक्षात आली. त्यांनी लायन्स क्लब, रत्नागिरी आणि लायन्स क्लब, हातखंबा रॉयल यांच्यावतीने त्याला व्हिलचेअर प्रदान केली.
यावेळी क्लबचे सचिव सैफुद्दीन पठाण, खजिनदार गिरीश शितप, सहसचिव दत्तात्रय क्षीरसागर, ॲड. अवधूत कळंबटे, सचिन सावेकर, शुभाली झगडे उपस्थित होते.