शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा चर्चा फेल! लाइव्ह स्ट्रीमिंगवर डॉक्टर ठाम; ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही
2
"राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू' म्हणाले होते अन्..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर प्रहार
3
धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत
4
"नेहरू म्हणाले होते, आरक्षणवाल्यांनी नोकरी मिळवली, तर सरकारी सेवांची क्वालिटी...!"; PM मोदींचा मोठा दावा
5
धक्कादायक! आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं, निक्कीवर हात उगारल्याने मिळाली मोठी शिक्षा
6
शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य
7
सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
8
“२०१७ मध्येच फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला, पण मराठा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला नाही”
9
"काँग्रेसच्या राज्यात गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जातेय, विघ्नहर्त्याच्या पूजेतही..."; PM मोदींचा हल्लाबोल
10
“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान
11
विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले...
12
"माझा राग देवेंद्रजींवर, कारण...", अखेर एकनाथ खडसेंनी सांगितला नेमका वाद काय?
13
भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट
14
पावसाच्या पाण्यात कार घालताय? एचडीएफसीच्या मॅनेजर, कॅशिअरचा बुडून मृत्यू
15
"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
16
“संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला”; शिंदे गटातील नेत्याने केला खळबळजनक दावा
17
Gold price : स्वस्त झाले की महागले, आठवडाभरानंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर किती?
18
दररोज रिकाम्या असतात शेकडो सिट्स, या ट्रेनमुळे रेल्वेला होतोय कोट्यवधीचा तोटा
19
"कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे"; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले...
20
“नाथाभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल”: फडणवीस

रत्नागिरी-मुंबई विमानसेवेची कॅप्टन शिवानी असेल - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:23 PM

रत्नागिरी : रत्नागिरी -मुंबई विमानसेवा सुरू झाली की, आपल्या रत्नागिरीचा अभिमान असलेली शिवानी नागवेकर ही त्या विमानाची कॅप्टन असेल ...

रत्नागिरी : रत्नागिरी-मुंबई विमानसेवा सुरू झाली की, आपल्या रत्नागिरीचा अभिमान असलेली शिवानी नागवेकर ही त्या विमानाची कॅप्टन असेल आणि पहिल्या विमानात मी आणि बाळासाहेब असणार, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीतील भाई विलणकर यांची नात शिवाजी नागवेकर हिने महिला वैमानिक हाेण्याचा मान मिळविला आहे. यानिमित्त तिचा माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात नागरी सत्काराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सत्कार साेहळ्याला माजी आमदार बाळ माने, माजी कुलगुरू श्रीरंग कद्रेकर, उद्याेजक रवींद्र सामंत, भाऊ शेट्ये, मिलिंद कीर, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित हाेते.मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, तिने किती कष्ट केले आहेत, ती कशी इथपर्यंत पाेहाेचली आहे, काेणत्या प्रसंगातून गेली आहे हे तिने सांगितले आहे; पण, प्रसंग तिनेही कुठेतरी लिहून ठेवले पाहिजेत. भविष्यात आपण काेठेही असू; पण मागे आपण किती कष्ट घेतले आहेत, हे लाेकांना कळले पाहिजे. शिवानीसारख्या विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. तुझ्यानंतर तयारी हाेणारी जी पिढी आहे, त्यांनाही कळले पाहिजे. पायलट म्हणून काम करीत असताना रत्नागिरी विमानतळाचा उल्लेख झाला. बाळासाहेबांनी सांगितले आहे की, विमानतळ येथे सुरू हाेणार; पण आज रत्नागिरीकरांच्या समाेर सांगताे की, विमानतळ सुरू करणार आणि पहिल्या विमानात शिवानी, मी आणि बाळासाहेब असणार, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, आपण जरी माेठे हाेताे, पण आपल्यातील नेतृत्वाला रत्नागिरीने जन्म दिलेला आहे. आपल्या पालकांनी, शिक्षणाने नेतृत्वाला जन्म दिलेला आहे हे जरी सांभाळलेस, तर रत्नागिरीकर तुला खांद्यावर घेऊन नाचतील, असेही सामंत म्हणाले. ज्यावेळी याठिकाणी एखादी इन्स्टीट्यूट बांधताे त्याचे नेतृत्व रत्नागिरीकर म्हणून करण्याची ताकद तुझ्या मनगटात असावी, असे सामंत म्हणाले. शिवानीमुळे विलणकर किंवा नागवेकरांचे नाव माेठे झाले नाही तर रत्नागिरीचे नाव माेठे झाले, असेही मंत्री सामंत म्हणाले.

अशी काेपरखळीबसस्थानक पण सुरू करणार बसस्थानकावर विमान मात्र लावणार नाही. कारण हल्ली बसस्थानकावर विमानदेखील लावण्याची प्रवृत्ती वाढतेय; पण शिवानीचे विमानतळ हे रत्नागिरीच्या विमानतळावरच १०० टक्केच उतरणार, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत