शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

श्वानाचा पाठलाग करताना बिबट्या शिरला पोलिस स्थानकात

By मनोज मुळ्ये | Published: January 25, 2024 5:10 PM

राजापूर : श्वानांचा पाठलाग करत चक्क बिबट्या राजापूर पाेलिस स्थानकात शिरल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. या बिबट्याने एका श्वानाला ...

राजापूर : श्वानांचा पाठलाग करत चक्क बिबट्या राजापूर पाेलिस स्थानकात शिरल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. या बिबट्याने एका श्वानाला उचलून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. तहसील कार्यालय व पाेलिस स्थानकाच्या व्हरांड्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहून पाेलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.राजापूर पाेलिस स्थानकाच्या आवारात बुधवारी रात्री श्वान फिरत हाेते. या श्वानांचा पाठलाग करत बिबट्या अचानक पाेलिस स्थानकाच्या मागील बाजूने आत शिरला. सुरुवातीला ताे बिथरला आजूबाजूला कुणी नसल्याचा अंदाज घेऊन ताे पुढे सरकला. बिबट्या येताच श्वानांनी पळ काढला, त्यातील एक श्वान थेट पाेलिस स्थानकातच शिरले. बिबट्याने पाेलिस स्थानकात शिरून एका श्वानाला पकडले. या श्वानाला पकडून बिबट्या तुरुंगाच्या दिशेने असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बाजूने पसार झाला. हा संपूर्ण प्रकार पाेलिस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.राजापूर पोलिस स्थानकाचे कर्मचारी रात्रीच्या वेळी कार्यरत असतात. काही कर्मचारी रात्रीचे काम उशिरा संपल्यामुळे तेथेच मुक्कामी असतात. दरम्यान, बुधवारी रात्री बिबट्याने पाेलिस स्थानकात शिरून श्वानाला पकडून नेल्याचा प्रकार काही पाेलिस कर्मचाऱ्यांनीही पाहिला. त्यामुळे रात्री कर्तव्यावर असणाऱ्या पाेलिसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याPoliceपोलिस