रत्नागिरी: सैन्य भरती मेळाव्यामध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मी च्या वतीने सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारले होते, या दहा दिवसांत भरतीसाठी आलेल्या 21 हजार तरुणांनी या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला. मागील 14 वर्षा पासून सुरू असलेल्या अन्नछत्रमध्ये आज अखेर भरतीसाठी आलेल्या पाच लाख तरुणांनी लाभ घेतला. रत्नागिरी येथे छ. शिवाजी स्टेडियम येथे भरती प्रक्रियांमध्ये पुणे विभागातील बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर तसेच रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, व गोवा राज्यातील हजारो मुलांची सैन्य भरती प्रक्रिया घेण्यात आली. खासकरून एआरओ ऑफीस चे कर्नल अनुराग सक्सेना यांनी भरती काळात भरतीसाठी आलेल्या मुलांना अन्नछत्र उभारण्यासाठी व्हाईट आर्मी स विनंती करण्यात आली होती. आज अखेर स्थलसेना, वायुसेना, 109 टी ए मराठा बटालियन, हरित सेना, सी आर पी एफ, पोलीस यांच्या भरती वेळी भरतीसाठी आलेल्या सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारून मुलांना भोजनाची सोय केली आहे.व्हाईट आर्मी चे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेंडे हणमंत कुलकर्णी यांच्या नियोजना अंतर्गत सुनील जाधव, सुमित साबळे,प्रेम पोवार, अविनाश भांडवले, प्रकाश पाटील, विकी खेडेकर, आदेश कांबळे, संतोष यादव, सुशांत पाटील, आणि देवचंद कॉलेज निपाणी चे विक्रम भोसले, ऋषिकेश कुंकेकर, आशितोष कावरे, गणेश परीट, व्यंकटेश घोडके, सुरज चोपडे, ओंकार चोपडे, ओंकार कोपर्डे, सतीश आंबी इत्यादींनी विशेष सहभाग घेतला.ररत्नागिरी स्थलसेना भरतीसाठी रत्नागिरी येथील नितीन सतोसकर, सुनील बोगाळे, कोल्हापूरमधील शाहू मार्केट यार्ड मित्र मंडळ सेवा भावी संस्थेचे किरण आरदाळकर, कुमार आहुजा, विवेक शेटे, राजेश मसाले, संजय कामत यांनी विशेष मदत केली.
भावी सैनिकांसाठी कोल्हापूरची 'व्हाईट आर्मी अन्नपूर्णा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:50 PM
आज अखेर स्थलसेना, वायुसेना, 109 टी ए मराठा बटालियन, हरित सेना, सी आर पी एफ, पोलीस यांच्या भरती वेळी भरतीसाठी आलेल्या सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारून मुलांना भोजनाची सोय केली आहे.
ठळक मुद्देविशेष सहकार्य रत्नागिरी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक संस्था आणि तरुणांचे लाभले.