शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

समोर कोणीही येऊदे, आम्ही भिडणार - आमदार शेखर निकम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 4:33 PM

महायुतीच्या समन्वय समितीचे संकेत

चिपळूण : आमदार भास्कर जाधव हे राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही. चिपळूणमधील उमेदवारी आपल्याला मिळेल की नाही ते माहित नाही. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार जो उमेदवार देतील, त्या उमेदवारासमोर कोणताही उमेदवार असला, तरी आम्ही त्याला भिडणार अशा शब्दात आमदार शेखर निकम यांनी ठणकावले.गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव हे गुहागरऐवजी चिपळूण मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच जाधव यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्ह्यात चिपळूणसह पाचही जागांवर शिवसेनेचा भगवा फडकवू, असे स्पष्ट केले होते. याविषयी आमदार शेखर निकम यांना सोमवारी (२८ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत छेडण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, मुळातच आमदार जाधव हे राज्याचे नेते असल्याने त्यांच्या वक्तव्यांवर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील. त्यांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे नाही, आपल्या ऐवजी पक्षाने दुसरा उमेदवार दिला तरी त्याचे काम जोमाने करण्याची तयारी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.आज विविध विकासकामांसाठी महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत स्थानिक पातळीवरील विकासकामांना मोठ्या प्रमाणात गती मिळालेली दिसेल, असेही आमदार निकम यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी नगरसेविका फैरोजा मोडक, आदिती देशपांडे, शिवानी पवार, उदय ओतारी, सचिन साडविलकर, विशाल जानवलकर उपस्थित होते.

समन्वय समितीचे संकेतसत्तेत सहभागी असलेले महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपापल्या स्तरावर काम करीत आहे. परंतु, भविष्यात या राजकीय पक्षांमध्ये समन्वय राहण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. त्यामध्ये महायुतीतील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. त्यामुळे आजच्या घडीला वेगवेगळ्या स्तरावर महायुतीचे काम सुरू असले तरी भविष्यात एकत्रितपणे महायुती भक्कमपणे काम करताना दिसेल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणShekhar Nikamशेखर निकम