शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

By admin | Published: February 03, 2017 1:04 AM

पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

रत्नागिरी : खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे पत्नीवर विळ्याने व दांडक्याने प्रहार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. डिगे यांनी दोषी ठरविले. नंदकिशोर शिवराम चौहान (वय ३५, रा. खालगाव-जाकादेवी) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नंदकिशोर चौहान हा सुशील देसाई यांच्या खालगाव येथील आंबा बागेत राखणदार म्हणून कामाला होता. तो या बागेतच पत्नी जगराना चौहानसोबत राहत होता. अन्य नेपाळीही तेथे कामासाठी होते. ३० एप्रिल २०१६ ला या बागेत काम करणारे अन्य कामगार बाजारपेठेत गेले होते. नंदकिशोर जगरानाकडे खर्चासाठी पैसे मागत होता; परंतु तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. नंदकिशोरचा राग अनावर झाला व त्याने जगरानावर लाकडी दांडका व लोखंडी विळ्याने प्रहार करण्यास सुरुवात केली. बसलेल्या नंदकिशोरला ताब्यात घेतले.या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. डिगे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे याप्रकरणी नऊ साक्षीदार तपासण्यात आले. गुरुवारी या खटल्याचा निकाल सुनावण्यात आले. सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने नंदकिशोर चौहानला भादंविक ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. (वार्ताहर)