राजापूर (जि. रत्नागिरी) - हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गंगामाईच्या आगमनाचे वृत्त समजताच अनेकांनी गंगाक्षेत्री धाव घेत गंगामाईच्या आगमनाची खात्री करून घेतली.साधारणपणे तीन वर्षांनी अवतरणाऱ्या गंगेच्या गेल्या काही वर्षांत आगमन-निर्गमनाच्या वेळेत आमुलाग्र बदल झाला आहे.यापूर्वी गंगेचे ७ मे २०१७ रोजी आगमन झाले होते. ती १९ जूनरोजी अंतर्धान पावली होती. त्याचवर्षी ६ डिसेंबर २०१७ आगमन व २० मार्च २०१८ रोजी अंतर्धान पावली होती.भूगर्भातील बदलांचा परिणामभूगर्भामध्ये झालेल्या बदलाचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे. भूगर्भात काही घडामोडी घडल्यानंतर गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता, त्या वेळी गंगेचे आगमन झाले होते. भारतासह अवघ्या जगताला त्सुनामीचा तडाखा बसला होता. त्यावेळीही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती.
चार महिन्यांतच गंगा पुन्हा अवतरली, गोमुखातून पाणी प्रवाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:47 AM