रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील ओव्हरसीज प्रा. लि. कंपनीच्या आवारातील गेस्ट हाऊसमध्ये जेवण बनवणाऱ्या महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला होता. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयगड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी फरार आहे.जखमी दीक्षा किरण मेस्त्री (३२, सडेवाडी, जयगड) या ओव्हरसीज कंपनीच्या आवारातील गेस्ट हाऊसमध्ये जेवण बनविण्याचे काम करीत होती. सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने पतीला फोन करुन पत्नी जखमी होऊन पडल्याचे सांगितले.पतीने घटनास्थळी जाऊन पाहिले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला होता. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखम गंभीर असल्याने उपचार सुरू असताना बुधवारी तिचा मृत्यू झाला.मेस्त्री यांना फोन करणारा मारुती मोहिते पाटील (हातकणंगले, कोल्हापूर) घटनास्थळावरून पळून गेला होता. याप्रकरणी रवींद्र विष्णू वझे (सडेवाडी, जयगड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मारुती मोहितेपाटील याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मारहाणीत महिलेचा मृत्यू, संशयित फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 6:06 PM
Crime News, Police, Ratnagirinews रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील ओव्हरसीज प्रा. लि. कंपनीच्या आवारातील गेस्ट हाऊसमध्ये जेवण बनवणाऱ्या महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला होता. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयगड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी फरार आहे.
ठळक मुद्दे मारहाणीत महिलेचा मृत्यू, संशयित फरारजयगड पोलिसांत गुन्हा दाखल