शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

लांजातील उड्डाण पुलाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:33 AM

लांजा : शहरातील भर बाजारपेठेत गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पुन्हा ठप्प झाले आहे. केवळ चार ते ...

लांजा : शहरातील भर बाजारपेठेत गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पुन्हा ठप्प झाले आहे. केवळ चार ते पाच अर्धवट स्थितीतील पिलर उभे करण्यात आले आहेत. हे काम मात्र अर्धवट स्थितीत ठप्प झाल्याने अनेक अडचणी आ-वासून उभ्या राहिल्या आहेत.

शहरातून जाणाऱ्या या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यापूर्वीच ते गतीने आणि एकमार्गी होणार असेल, तरच बाजारपेठ हटवा, अशी मागणी महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने प्रशासनाकडे वारंवार केली होती. शहराच्या भर बाजारपेठेत असलेल्या या महामार्गावर हा उड्डाणपूल होत असल्याने या ठिकाणचे जवळपास साडेतीनशे छोटे-मोठे व्यापारी विस्थापित झाले असल्यानेच ही मागणी करण्यात आली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी याबाबत उदासीन राहिले आहेत. याचा फटका लांजा शहराला आणि जनतेला बसत आहे. याबाबत महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीचे प्रमुख महंमद रखांगी यांनी सांगितले की, लांजातील या ओव्हरब्रिजचे केवळ दाखवण्यापुरते उणेपुरे काम झाले आहे. या कामाला कोणतीही गती नसल्याने हे बांधकाम दीर्घकाळ रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उड्डाणपुलासाठी झालेल्या भूसंपादनात सर्व व्यापारी बाजारपेठ उद्ध्वस्त करण्यात आली आहे. येथील जवळपास ३५० व्यापाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून उड्डाणपुलाच्या कामाच्या नावाखाली कायमचे हटविण्यात आले आहे. उड्डाणपूल बांधताना साईडपट्टी, डायवर्जन, सर्व्हिसरोड आदींची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. या सर्वांची तरतूद प्राधान्याने करणे आवश्यक असताना, केवळ मलमपट्टी करण्याचे काम संबंधित करीत आहेत. अंदाजपत्रकात समाविष्ट आणि तरतूद असलेली ही कामे करण्यात आलेली नसल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत.

सद्यस्थितीत कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे नसल्याने पावसाच्या पाण्याचा प्रचंड त्रास बाजारपेठेला होत आहे. यावर्षी पूर्णतः गटारे बुजल्याने संपूर्ण बाजारपेठेत पावसाचे पाणी घुसणार आहे. मुळात बाजारपेठेतील दोन किलोमीटरच्या टप्प्यात रस्ताच गायब झाला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महामार्ग पाण्याखाली जाऊन नदीचे स्वरूप आले होते. यावरून येथील बिकट परिस्थितीची कल्पना येते.

महंमद रखांगी पुढे म्हणाले की, चार वर्षांहून अधिक काळ मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. हे चौपदरीकरण २०१८ ला पूर्णत्वास जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज २०२१ चा मे महिना संपत आला तरीही महामार्गाच्या कामाला कोणतीही गती प्राप्त झालेली नाही. लांजा तालुक्यातील वाकेड ते आरवली हा जवळपास ८९ किलोमीटरचा टप्पा पूर्णतः रखडलेला आहे. अवघे १० टक्के थातुरमातुर काम झाले आहे. या टप्प्यात येणाऱ्या लांजा बाजारपेठेत मात्र चौपदरीकरणाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.

नगरपंचायत नळपाणी योजनेच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनचे काम, महावितरणचे विद्युत पोल आणि विद्युतलाईनचे काम, साईडपट्टीचे कोणतेही नियोजन नाही. उड्डाणपुलाला लागून ॲप्रोच रोड तयार करण्याबाबत महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यात उदासीनता दिसून येत आहे.

पक्क्या स्वरूपाचे सर्व्हिस, ॲप्रोच, डायवर्जन रोड करण्यात आलेले नसल्याने संपूर्ण बाजारपेठ आणि लांजा शहर धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहे. महामार्गावरून मोठमोठाल्या वाहनांची नियमितपणे वाहतूक होत असल्याने या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. रेस्ट हाऊस ते बसवेश्वर चौक असा सर्व्हिस रोड पूर्ण शहरात तयार होणे गरजेचे आहे. हा सर्व्हिस रोड पक्क्या स्वरूपाचा म्हणजेच डांबरीकरणाचा होणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार कंपनीने केवळ मलमपट्टी करून, खडी पसरवून कच्चा मातीचा हा रस्ता केला आहे. हा रस्ता जाग्यावर राहिलेला नाही. यामुळे बाजारपेठेत महामार्गावरील रस्ता शोधणे अवघड बनले आहे. पावसाळ्यात तर यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत.

लांजा बाजारपेठेला वाचविण्यासाठी बायपास असावा, अशी भूमिका घेऊन महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने आवाज उठविला होता. परंतु भर बाजारपेठेतूनच महामार्ग नेण्याचा निर्णय झाल्यानंतर या शहरात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला. मात्र हा निर्णय सर्वार्थाने चुकीचा ठरत असून, बजेटच्या दृष्टीनेही हा ओव्हरब्रीज परवडणारा नाही, हे स्पष्ट झाले असल्याचे रखांगी यांनी सांगितले.