खेड : मान्सूनच्या पावसाला अवघा महिना राहिला असून, खेड महावितरणकडून पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घेतली आहेत. शहरातील नादुरुस्त वीजखांब बदलण्याचे काम हाती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
खेड शहरात ठिकठिकाणचे नादुरुस्त वीजखांब बदलण्याबाबत नागरिकांनी महावितरणकडे अनेकदा निवेदने दिली होती. मात्र, या तक्रारींकडे सामग्री उपलब्ध नसल्याने दुर्लक्ष करण्यात येत होते.
पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त वीजखांब
बदलण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्यानंतर गुरुवार, दिनांक २९ मेपासून महावितरणने हे काम हाती घेतले आहे. शहरातील नगर परिषद कार्यालय
व तीन बत्तीनाका येथील जुने धोकादायक झालेले वीजखांब काढून नवीन वीजखांब उभे करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील अन्य ठिकाणी असलेले धोकादायक वीजखांब लवकरच बदलण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली आहे.
............................................
khed-photo31
खेड शहरातील धोकादायक झालेले वीजखांब बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.