रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथे रॉटव्हीलर श्वानाने एका कामगारावर हल्ला केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. या श्वानाला पकडण्यासाठी पोलीस आणि वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.मुरूगवाडा येथील रॉटव्हीलर जातीचा श्वान एकाने पाळला आहे. याठिकाणी काम करणाऱ्या एका कामगारावर या श्वानाने गुरूवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यात कामगाराला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.श्वानाने केलेल्या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला असून, श्वान कंपाउंडमध्ये अजूनही सुटा असल्याने या कामगारापर्यंत पोहोचणे अवघड जात आहे. श्वानाला जेरबंद करण्यासाठी रत्नागिरीतील प्राण्यांचे डॉक्टर भागवत यांना बोलावण्यात आले आहे. नळीद्वारे इंजेक्शन मारून या श्वानाला बेशुद्ध करण्यात येणार असून, कुत्रा बेशुद्ध झाल्यावरच जखमी कामगारापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
रत्नागिरीत श्वानाच्या प्राणघातक हल्ल्यात कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 2:53 PM
dogbite, ratnagirinews, forestdepartment रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथे रॉटव्हीलर श्वानाने एका कामगारावर हल्ला केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. या श्वानाला पकडण्यासाठी पोलीस आणि वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
ठळक मुद्देरत्नागिरीत श्वानाच्या प्राणघातक हल्ल्यात कामगाराचा मृत्यूश्वानाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु