दापोली : दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गिम्हवणे गणाती सदस्य योगिता बांद्रे यांची यांची बिनविरोध निवड करण्यात आली़राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हर्णै गणाचे पंचायत समिती सदस्य रउफ हजवाने यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने दापोली पंचायत समिती सभापती पद रिक्त झाले होते़ या रिक्त पदावर बांद्रे यांची वर्णी लागली आहे़ निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार यांनी ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली़ या पदासाठी योगिता बांद्रे यांचा एकच अर्ज दाखल झाला होता़ सभापतीपदी योगिता बांद्रे यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले होते़ त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आला़दापोली पंचायत समिती सभापती निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, प्रांतिकचे सदस्य मुजीब रुमाने, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, रवींद्र कालेकर, विजय मुंगसे, पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र गुजर, चंद्रकांत बैकर, दीपक खळे, काळूराम वाघमारे, माजी सभापती ममता शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता तांबे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई उपस्थित होते.
दापोली पंचायत समितीच्या समिती सभापतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 12:22 PM
Ncp Dapoli Ratnagiri : दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गिम्हवणे गणाती सदस्य योगिता बांद्रे यांची यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
ठळक मुद्देदापोली पंचायत समितीच्या समिती सभापतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध अविश्वास ठराव मंजूर झाल्याने दापोली पंचायत समिती सभापती पद रिक्त