शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक -अनंत गीते, वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 1:44 PM

Anant Geete Shiv Sena Ratnagiri- राज्यात असलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे विधान माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार अनंत गीते यांनी केले. शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देतुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक ; गीते यांची स्पष्टोक्तीमहाआघाडी फक्त सत्तेसाठीच, वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

असगोली/रत्नागिरी : राज्यात असलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे विधान माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार अनंत गीते यांनी केले. शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना गीते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख बाबू सावंत, चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत, पंचायत समिती सदस्या पूर्वी निमुणकर, रवींद्र आंबेकर, शृंगारतळी शहरप्रमुख नरेश पवार, नारायण गुरव, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार व प्रमुख पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.भाषणाच्या सुरुवातीला अनंत गीते यांनी कोरोना काळातील प्रसंगांचा उल्लेख करून याची भयानकता व घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, राज्यातील तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्यामुळे आपण नेमके कुणाशी लढायचे, असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. या कारणाने शिवसैनिकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी मी आलो आहे.

हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे. मात्र, आपण शिवसैनिकच आहोत, आघाडी सैनिक नाही असे स्पष्ट करून, पुढील कोणत्याही निवडणुकांत स्वबळावर आपण ताकद दाखविणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोठेही आघाडी झालेली मला पाहायला मिळालेली नाही. तसे मी स्वबळावर लढावे असे आदेशही दिले होते. त्यामुळेच राज्यात ३,३०० इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.ते म्हणाले की, शिवसेनेचा जो शाखाप्रमुख माझ्याकडे येईल आणि मला बोलेल की, हा मेळावा माझ्या गावी घ्या, त्याचवेळी मी त्याच्या गावामध्ये मेळावे घेईन. कुणावरही मेळाव्याची जबरदस्ती करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यामध्ये मी असे मेळावे घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी संभ्रमावस्था आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी त्यांनी आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचे कौतुक करून, असे महोत्सव शिवसेनेच्या माध्यमातून सर्वत्र होण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असे सांगितले.म्हणून ते आले नाहीतअनंत गीते यांनी या मेळाव्यात आघाडी सरकारमधील कोणत्याही नेत्यावर भाष्य केले नाही. मात्र, आज अनेक नेत्यांचे दौरे या तालुक्यात होणार होते. मी येणार हे समजल्यावर ते आलेले नसावेत, असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेRatnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना