रत्नागिरी : गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना निवळी - गणपतीपुळे मार्गावरील तरवळ फाटा येथे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. धनाजी शिवकुमार तेवरे (३५, पेठ वडगाव, हातकणंगले, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.धनाजी तेवरे आणि त्याचा मित्र हे दोन दुचाकीवरुन कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील पेठ वडगांव येथून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघाले होते. हे दोघेही निवळी-गणपतीपुळे मार्गावरुन जात असताना तरवळ येथे आले असता धनाजी याच्या दुचाकीला अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. आपला मित्र बरोबर नसल्याचे लक्षात येताच तो पुन्हा मागे आला. त्यावेळी धनाजीच्या गाडीला अपघात होऊन जागेवर पडल्याचे लक्षात आले.या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर धनाजीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
तरवळ फाटा येथील अपघातात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 15:57 IST
Accident Ratnagirinews- गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना निवळी - गणपतीपुळे मार्गावरील तरवळ फाटा येथे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. धनाजी शिवकुमार तेवरे (३५, पेठ वडगाव, हातकणंगले, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तरवळ फाटा येथील अपघातात तरुण ठार
ठळक मुद्देतरवळ फाटा येथील अपघातात तरुण ठारशवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात