रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील तरुणांचे लसीकरण यशस्वी झाल्यानंतर संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील १८ ते २९ वयोगटातील तरुणांसाठी २० ते ३० ऑगस्ट २०२१ या कालावधीत लसीकरण शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ २० ऑगस्ट राेजी पाली व हातखंबा येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्य हस्ते होणार आहे.
मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने ७ जुलै ते ९ जुलै २०२१ या कालावधीमध्ये रत्नागिरी शहरातील ६,५७२ तरुणांचे लसीकरण झाले होते. हे शिबिर यशस्वी झाल्यानंतर रत्नागिरी मतदारसंघातील ग्रामीण भागातील १५००० तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. लसीकरण शिबिराचा शुभारंभ २० ऑगस्ट रोजी हातखंबा जिल्हा परिषद गटामधील पाली येथील डी.जे. सामंत महाविद्यालय तसेच हातखंबा येथील सिद्धिगिरी मंगल कार्यालय येथून सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे.
या शिबिरांतर्गत २० रोजी हातखंबा जिल्हा परिषद गटातील हातखंबा गणासाठी सिद्धिगिरी मंगल कार्यालय हातखंबा तिठा, पाली गणासाठी डी.जे. सामंत महाविद्यालय पाली येथे हे शिबिर हाेणार आहे. तसेच २१ रोजी करबुडे गणासाठी करबुडे हायस्कूल, देऊड गणासाठी बाबाराम कदम, ज्युनिअर कॉलेज, जाकादेवी येथे लसीकरण हाेणार आहे. २३ रोजी कुवारबाव गणासाठी जिल्हा परिषद शाळा कुवारबाव, ग्रामपंचायत कुवारबावसमोर, नाचणे गणासाठी बालाजी मंगल कार्यालय, शांतीनगर नाचणे, २४ रोजी कर्ला गणासाठी टेंभ्ये हातिस ग्रामपंचायत, हरचिरी गणासाठी चिंद्रवली ग्रामपंचायत, २५ रोजी पावस गणासाठी विद्यामंदिर पावस, गावखडी गणासाठी सरस्वती विद्यामंदिर, गावखडी, २६ रोजी गोळप गणासाठी ग्रामपंचायत गोळप हॉल, फणसोप गणासाठी लक्ष्मीकेशव विद्यामंदिर, फणसोप २७ ऑगस्ट २०२१ रोजी शिरगाव गणासाठी जाकीमिऱ्या ग्रामपंचायत हॉल, कासारवेली गणासाठी ओंकार मंगल कार्यालय बांदखिंड, शिरगाव, २८ रोजी कोतवडे गणात घैसास हॉल कोतवडे, मालगुंड गणासाठी महालक्ष्मी हॉल गणपतीपुळे, २९ रोजी वाटद गणासाठी सर्वसाक्षी हॉल, वाटद, वरवडे गणासाठी बापू जोशी हॉल, वरवडे, ३० रोजी नावडी गणासाठी कोळंबे ग्रामपंचायत, फुणगूस गणासाठी काेंड्ये ग्रामदेवता मंदिर, ३० रोजी मिरजोळे गणासाठी मिरजोळे ग्रामपंचायत हॉल, फणसवळे गणासाठी फणसवळे ग्रामपंचायत हॉल येथे लसीकरण शिबिर हाेणार आहे.
या लसीकरण शिबिराच्या आयोजनासाठी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप तसेच युवासेना रत्नागिरी तालुका व शहर पदाधिकारी तसेच शिवसेना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी मेहनत घेत आहेत.