शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Lok Sabha Election 2019 तरूण मतदार ठरविणार नवा खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:58 PM

रत्नागिरी : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील तरूणांची ...

रत्नागिरी : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील तरूणांची संख्या सुमारे पाच लाखाच्या आसपास असल्याने या तरूणांच्या मतदानात खासदार कोण, हे ठरविण्याचे सामर्थ्य आहे.मागील काही वर्षात निवडणुकीची टक्केवारी घसरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मतदारांची नाव नोंदणीसाठी असलेली उदासीनता तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी असलेली अनुपस्थिती, यामुळे मतदानाची टक्केवारी असमाधानकारक अशी आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोगाकडून प्रयत्न होत आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडूनही विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सुचनेनुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविला. यात मतदार यादीतील नावे वगळणे, दुरूस्ती तसेच नव्याने नाव समाविष्ट करणे, या तीन मुद्द्यांवर आधारित हा कार्यक्रम होता. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती करण्यात आली.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्तिगतरित्या १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांशी संपर्क करून त्यांना त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले. त्यामुळे विविध वयोगटातील मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.३१ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारांच्या संख्येनुसार दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या १३ लाख ९५ हजार ५३८ इतकी आहे. यात १८ ते १९ या वयोगटातील मतदार २६,७७४ इतके आहेत, तर २० ते २९ या वयोगटातील मतदारांची संख्या २ लाख २० हजार ९०३ इतकी आहे. १८ ते ३९ या वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ९९ हजार ४०९ इतकी आहे. म्हणजेच या वयोगटातील मतदार एकूण संख्येच्या ३६ टक्के आहेत. त्यामुळे या मतदारांच्या मतांवर कोण खासदार निवडून येणार, हे ठरणार आहे.त्याचबरोबर ४० ते ५९ या वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ८९ हजार इतकी आहे. त्यामुळे मतदारांची मतेही कोण खासदार होणार, हे ठरण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. ६० ते ६९ वयोगटातील मतदारांची संख्या १ लाख ५२ हजार ३३७, ७० ते ७९ या वयोगटातील मतदारांची संख्या ९८,८२३, तर ८० वर्षांवरील मतदारांची संख्या ५५,९६८ इतकी आहे.या सर्वच वयोगटातील महिला मतदारांचा विचार करता १८ ते १९ वयोगटात महिला मतदार कमी असल्या तरी त्यापुढील सर्वच वयोगटात महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खासदार निवडीत महिला मतदारांचा वाटाही खूप मोठा असेल, हे निश्चित आहे.उमेदवारांची : भीस्त तरूण मतदारांवरप्रचार यंत्रणांमध्ये तरूणवर्ग उत्साहाने काम करीत असतो. त्यामुळे उमेदवारांचेही विशेष लक्ष तरूण मतदारांवरच असते. यावेळीही सर्वच उमेदवारांनी तरुणांवर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियाचा वापर करणारी पिढी सर्वाधिक याच वयोगटातील असल्याने उमेदवारांनीही चाळिशीच्या आतील मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत आहेत.महिला मतदारांचीही मते ठरणार निर्णायक...रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या एकूण १४ लाख ४० हजार ९६६ मतदारांपैकी महिला मतदार ७ लाख ३५ हजार ९९७ इतके, तर पुरूष मतदारांची संख्या ७ लाख ५ हजार ३५० इतकी आहे. साहजिकच महिलाची मते खासदार निवडीसाठी निर्णायक ठरणार आहेत.ज्येष्ठही ठरणार श्रेष्ठरत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील ७० वर्षापुढील मतदारांची संख्या १,५४,७९१ इतकी आहे. त्यामुळे अनेक पावसाळे पाहिलेल्या या मतदारांवरही उमेदवारांची भिस्त असणार आहे. मात्र, तरीही प्रचारासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना या वयोगटातील ज्येष्ठांना मतदानासाठी बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक