खेड : मुंबई युवा फाउंडेशनच्या वतीने तळे, पुरे, वेरळ व खेड परिसरात मदतीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख विजय जाधव, विभागप्रमुख श्रीकांत शिर्के, राजेंद्र शेलार, महेंद्र पाटणे, प्रकाश पाटणे, रणजित जाधव, नरेश घरटकर आदी उपस्थित होते.
मदतीचा ओघ
मंडणगड : कादवण बजरंगबली क्रिकेट संघातर्फे महाडमधील गोठे बुद्रुक, सवगाव, महाड शहरातील शिवाजी चौकात अन्नधान्य, पाणी, औषधे यासह जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. बजरंगबली क्रिकेट संघाने मदत करण्याची हाक दिल्यानंतर अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद मिळाला.
उपाहारगृह सुरू
दापोली : दापोली एसटी आगारातील उपाहारगृह नुकतेच सुरू करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय आता टळणार आहे. यावेळी माजी आमदार संजय कदम, माजी पंचायत समिती सभापती राजेश गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे उपस्थित होते.
सरपंचपदी नियती बटावळे
दापोली : दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोंगळे सातांबा सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियती बटावळे यांची नुकतीच निवड झाली आहे. नूतन सरपंच बटावळे यांचा माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचवेळी विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
आपटीमध्ये गुणगौरव
खेड : तालुक्यातील आपटी- बोरघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दहावी- बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सरपंच दीपक बनकर, उपसरपंंच सुनील रांगले, सदस्य दिनेश घडवले, कीर्ती गायकवड आदी उपस्थित होते.
पंचायत समितीला पुरस्कार
दापोली : प्रधानमंत्री आवास योजना व रमाई-शबरी आवास योजनेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते नुकताच दापोली पंचायत समितीला देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी स्वीकारला.