खेड : एसटी बसस्थानक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून डोक्यात पडल्याने एक महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना येथील बसस्थानकात घडली.परमेश्वर नागोठकर असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव असून त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारा परमेश्वर नागोठकर हा महाविद्यालयीन युवक दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्थानकातील आरक्षण खिडकीच्या बाजूला तुळशी एसटी बसची वाट पाहत उभा होता. याच दरम्यान बसस्थानकाच्या आरक्षण खिडकीजवळ स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग अचानक कोसळला.यातील काही भाग परमेश्वर याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. बसस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशानी जखमी झालेल्या परमेश्वर याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. बसस्थानकाच्या इमारतीचा स्लॅब ढासळू लागला असल्याने खेड बसस्थानकावर एसटी बस साठी येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खेड स्थानकात स्लॅब कोसळून युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 3:37 PM
एसटी बसस्थानक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून डोक्यात पडल्याने एक महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना येथील बसस्थानकात घडली.
ठळक मुद्देखेड स्थानकात स्लॅब कोसळून युवक गंभीर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न