शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

युवकास सात वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Published: January 12, 2017 11:02 PM

युवती अत्याचार प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील योजना केमिकलमध्ये गुरुवारी झालेल्या वायुगळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरातील अनेक ग्रामस्थ गुदमरले. दोन कामगारांसह दोन ग्रामस्थांना गंभीर बाधा झाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.कंपनीत रंग बनविण्याचे काम सुरू असताना रिअ‍ॅक्टरचा पाईप तुटल्याने कंपनीच्या रिअ‍ॅक्टरमधील ‘ओलियम’ या अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची गळती झाली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. लगतच असणारी लोटे वसाहतीतील चाळकेवाडी, गुणदेची तलारीवाडी, आवाशीची भेडेवाडी, ताम्हणवाडी येथील ग्रामस्थांना गुदमरल्यासारखे झाल्याने श्वास घेणे अवघड होत होते.यावेळी एस. के. आंब्रे, अंकुश काते, अरुण चव्हाण, चंद्रकांत चाळके, चेतन वारणकर, धनंजय रेडीज, शशांक रेडीज, प्रियकांत रेडीज, नाना चाळके, असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीराम खरे, पुटकरचे राजेश तिवारी, नंदादीपचे मिलिंद बापट, एक्सलचे एस. वाय. पाटणकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अभिजित कसबे, लोटे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एच. काकडे, विवेक साळी उपस्थित होते. लोटे अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी गळती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. यामध्ये विनोद गणपत मोरे (वय २७, कापरे, चिपळूण) व किशोर केशव रेवाळे (३६, रा. चिपळूण) हे कामगार भाजले असून, सुनंदा यशवंत चाळके (७०, चाळकेवाडी), तसेच लोटेचे उपसरपंच रवींद्र गोवळकर यांना वायुबाधा झाली. त्यांना परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोवळकर यांना अधिक त्रास होत असल्यामुळे सायंकाळी उशिरा त्यांना खेडच्या हृदयविकार तज्ज्ञांकडे हलविण्यात आले आहे. दोन्ही कामगारांना अधिक उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे.एक्सल इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीची संपूर्ण सुरक्षा समिती ही वायुगळती आटोक्यात आणण्यात गुंतली होती. इतकेच नव्हे, तर यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही कंपनीतूनच आणली जात होती. एक्सलसह ए. बी. मौरी व घरडाचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी मदतीला धावले होते.तब्बल दोन तास उलटले तरी कंपनी मालक व पोलिस वगळता प्रशासनाचे कोणतेही जबाबदार अधिकारी घटनास्थळी येत नसल्याने जमावाचा उद्रेक झाला होता. यावेळी आलेल्या सीईटीपी व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत ‘तू-तू मै-मै’ झाली. बेजबाबदारपणे सुरक्षा साधनांचा वापर न करणाऱ्या कंपन्या तत्काळ बंद करा, अशी मागणी जमावातून होत होती.पर्यावरणमंत्र्यांच्या तालुक्यात औद्योगिक सुरक्षेचे वाभाडे निघत आहेत. केवळ नोटीस देऊनही समस्या सुटणार आहे का? आमच्या सुरक्षेची हमी काय? असे प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.या दुर्घटनेनंतर खेडचे तहसीलदार अमोल कदम, पोलिस उपविभागीय अधिकारी विकास गावडे, पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताचा पंचनामा सुरू असून, जखमींचे जबाब झाल्यानंतर अपघात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बी. एच. काकडे यांनी दिली. (वार्ताहर)कंपनीत रंगाचे काम सुरू होते. दुसऱ्या मजल्यावरील गॅसच्या पाईपलाईनवर कामगाराचा पाय पडल्याने तो पाईप तुटला. यामुळे गॅस बाहेर आला. यावेळी कंपनीत आठ कामगार काम करीत होते. त्यापैकी विनोद गणपत मोरे (वय २७, कापरे, चिपळूण) व किशोर केशव रेवाळे (३६, चिपळूण) हे दोनजण भाजले असून, त्यांना प्रथम परशुराम रुग्णालयानंतर अधिक उपचारासाठी सांगली येथे पाठविले आहे. या गॅसने केवळ अ‍ॅसिडिटी होते. इतर कोणताही परिणाम शरीरावर होत नाही. हे रोखण्यासाठी आवश्यक असणारी उपाययोजना कंपनीत उपलब्ध होती. तीच एक्सलच्या टीमने वापरली. हा अपघात एक दुर्दैवी आहे.- अजय मेहता, कंपनी मालकसुरक्षा यंत्रणाच नाहीकंपनीत कसलीच सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसून, या वायुगळतीला नियंत्रणात आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी व उपाययोजना आवश्यक होत्या, त्यांचा प्रामुख्याने अभाव दिसून आला. साधे नाकाला लावण्यात येणारे मास्कही उपलब्ध नसल्याने कामगारही गुदमरले जात असल्याचे उपस्थितांनी निदर्शनास आणले. कंपनीचा आवारही मोकळा नसल्याने अग्निशमन दलालाही अडचणीचा सामना करावा लागत होता.दोन महिन्यांतील चौथी घटनाही संपूर्ण रासायनिक वसाहत सुरक्षेच्या दृष्टीने चर्चेत आली असून, गेल्या दोन महिन्यांत नंदादीप केमिकल कंपनीत टाकीचा स्फोट होऊन एक कामगार मृत झाला, तर सुप्रिया केमिकलमधील अपघातात दोन कामगारांनी जीव गमावला. याआधी गरुडा केमिकल कंपनीत लागलेल्या वायूने एकाचा बळी गेला होता. त्यानंतरची आजची ही चौथी घटना आहे. त्यामुळे इथली सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याचे चित्र आहे.