रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या सन २०१८-१९च्या २० कोटी ९७ लाख ८८ हजार ७३० रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला आज (सोमवारी) झालेल्या सर्वसामाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. हे अंदाजपत्रक वित्त व शिक्षण सभापती दीपक नागले यांनी सभागृहात मांडले.
हे अंदाजपत्रक सादर करताना सभापती नागले यांनी सभागृहाला सांगितले की, सन २०१७-१८चे अंतिम सुधारित व सन २०१८-१९चे मूळ अंदाजपत्रकामध्ये विभागांचे मागणीप्रमाणे जरी भरीव तरतूद उपलब्ध करुन देऊ शकलो नसलो तरीदेखील न्याय देण्याच्या प्रयत्न केला आहे. अध्यक्ष, सामान्य प्रशासन या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ची अंतिम सुधारीत तरतूद ८९ लाख ६६ हजार २०० रुपये इतकी असून, सन २०१८-१९ची मूळ तरतूद ९६ लाख २५ हजार १४४ रुपये इतकी आहे. सामान्य प्रशासन या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ची मूळ तरतूद ९१ लाख ४५, हजार २०० रुपये इतकी असून, सन २०१८-१९ची मूळ तरतूद १ कोटी ९ लाख २० हजार ६८८ रुपये इतकी आहे. ही तरतूद मागील वर्षापेक्षा यावर्षी जास्त करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती योजनांसाठी २० टक्के निधीची तरतूद करणे अनिवार्य आहे. त्यासाठी मागील वर्षाची अंतिम सुधारीत तरतूद ३ कोटी ९५ लाख ५३ हजार ४६३ रुपये इतकी असून, सन २०१८-१९ची मूळ तरतूद २ कोटी ७३ लाख ५० हजार १६० रुपये आहे. समाजकल्याण विभागामध्ये मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी २० टक्के निधीची तरतूद करणे अनिवार्य असून, सन २०१८-१९ची मूळ तरतूद १ कोटी ९३ लाख ३७ हजार ५४० रुपये इतकी करण्यात आली आहे. अपंगांच्या कल्याणकारी योजनांसाठी ३ टक्के निधीची एकूण अंदाजपत्रकाच्या सन २०१८-१९ची मूळ तरतूद ४४ लाख ७७ हजार ४४९ रुपये इतकी करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी १० टक्के निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार सन २०१८-१९ची मूळ तरतूद ९६ लाख ६८ हजार ७७० रुपये इतकी करण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी सन २०१८-१९ची मूळ तरतूद १ कोटी ७ लाख ८१ हजार ६५० रुपये करण्यात आल्याचे नागले यांनी सांगितले.
बांधकाम विभागासाठी मूळ तरतूद २ कोटी ३ लाख ५२ हजार १६३ रुपये, पाटबंधारेसाठी केवळ ५० हजार रुपये इतकीच करण्यात आली आहे. आरोग्य विभागासाठी ७४ लाख ३४ हजार ५० रुपये, शेती विभागासाठी मूळ तरतूद ७५ लाख १२ हजार ३०७ रुपये तर पशुसंवर्धन विभागासाठी ५४ लाख ७७ हजार ७२४ रुपये, जंगल महसूल गावांमध्ये निरनिराळ्या योजना राबविण्यासाठी एक लाख रुपये इतकी मूळ तरतूद केली आहे.
सामुहिक विकासासाठी १ कोटी २१ लाख १३ हजार ५९५ रुपये, संकीर्ण ऊर्जा विकासासाठी ५ लाख रुपये, जिल्हा परिषद आस्थापनेवरील निवृत्त कर्मचाºयांसाठी मूळ तरतूद रुपये १८ लाख, जिल्हा परिषद घसारा निधी, धर्मादाय आणि संमेलने, कर्मचारी क्रीडा स्पर्धा, ठेव संलग्न विमा योजना, अंगणवाडी इमारत दुरुस्ती, तेथील मुलांना औषधे ठेवणेसाठी गोडावून व इतर योजनांकरिता मूळ तरतूद ९४ लाख ८ हजार १५६ रुपये केल्याचे दीपक नागले यांनी सांगितले.