शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
3
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
4
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
5
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
8
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
9
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
10
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
11
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
12
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
13
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
14
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
15
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
16
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
17
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
18
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
19
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

रत्नागिरीत प्राणी संग्रहालयाच्या कामाला १ डिसेंबरपासून प्रारंभ होणार, ७५ कोटींचे अंदाजपत्रक

By शोभना कांबळे | Published: November 17, 2023 3:35 PM

पालकमंत्री सामंत यांनी दिले निर्देश

रत्नागिरी : शहरानजिकच्या आरेवारे येथे होणाऱ्या प्राणी संग्रहालयाच्या कामाला १ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. ७५ कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ३ कोटी ८५ लाख रूपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आले आहेत.मंत्री उदय सामंत यांनी या प्राणी संग्रहालय उभारणीसंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून प्राणी संग्रहालयाच्या सामंजस्य कराराबाबत लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून प्राणी संग्रहालयाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी ३ कोटी ८५ लाख आणि वाॅल कंपाऊंडसाठी ५ कोटी रूपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार असून प्राणी संग्रहाच्या वॉल कंपाउंड चे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी या बैठकीत दिले.या कामासाठी सिंधू रत्न योजनेमधून दहा कोटी रूपये देण्यात येणार असून एक डिसेंबरपर्यत कामाला सुरवात करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री यांनी दिले आहे. प्राणी संग्रालय हा रत्नागिरीमधील महत्वाचा प्रकल्प असून तो पूर्ण करण्याची मानसिकता अधिकारी वर्गाने ठेवून जोमाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.यावेळी चिपळूण - संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ति किरण पुजार, उप मुख्य कार्यकरी अधिकारी परिक्षित यादव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी भरत चौघुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत