शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ऑफिसच्या रंगरुपाचा कायापालट; 21व्या शतकातील सकारात्मक बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 1:06 PM

खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये हा बदल वेगाने झालेला दिसून येतो. त्यापाठोपाठ इतर कार्यालयंही बदलत चालली आहेत.

मुंबई- ऑफिस म्हटलं की फायलींचा ढिगारा, त्या ढिगाऱ्यात खुपसलेल्या माना, कंटाळवाणे रंग, अंधुक प्रकाश असे सरकारी कार्यालयांचे रुप तुमच्या डोळ्यांसमोर असेल. पोस्टामध्ये तिकीटं चिकटवायच्या जागेजवळ पुसलेली खळीचं बोटं आणि बँकांमध्ये दोरीला बांधलेले पेनही तुम्ही पाहिली असतील. मात्र भारतातील ऑफिसची रचना आणि त्यांचे रंगरुप आता बदलत चालले आहे. खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये हा बदल वेगाने झालेला दिसून येतो. त्यापाठोपाठ इतर कार्यालयंही बदलत चालली आहेत.

1) ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक ऊर्जेने आणि तितक्याच उत्साहाने काम  करता यावे यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा, स्वच्छता यांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.2) स्टार्ट अप कंपन्यांच्या ऑफिसमध्ये अधिक मोकळ्या वातावरणाचा अनुभव घेता येतो. केबिन्सच्या चौकोनांमध्ये अडकलेली कार्यालयं या कंपन्यांनी मोकळी केली. कोणीही आपल्याला हव्या त्या जागेवर बसून कॉफी पित लॅपटॉपवर काम करावे अशी रचना नव्या कंपन्यांमध्ये दिसत आहे.

3) काही कंपन्यांनी पूर्वीच्या खुर्ची टेबलच्या जुनाट पद्धतीला निरोप देऊन बसण्याची नवी योजना करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये खिडकीतील कट्ट्यापासून बिनबॅग पर्यंत विविध नव्या उपायांचा विचार त्यांनी केला. यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्याला हव्या त्या जागेवर आरामशीर बसून काम करता येते.

4) काही कंपन्यांनी डायनिंग टेबलसारख्या मोठ्या टेबलभोवतीही बसून लॅपटॉपवर काम करण्याची सुविधा देऊ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद साधण्यासही त्यांना मदत झाली.

5) कार्यालयांच्या नव्या रचनेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठीही जुनाट पद्धतीचा वापर करण्याऐवजी पाहुण्यांना मोकळे, आपलेसे वाटेल असे वातावरण तयार केले जाते. एकदम घरगुती वाटेल अशा पद्धतीच्या वातावरणात आदरातिथ्य केल्यास येणाऱ्या व्यक्तीला अधिक प्रसन्न वाटते असा अनुभव आहे.

6) ज्या कंपन्यांचा संबंध सतत ग्राहकांशी येतो त्या कंपन्यांनीही आपल्या रचनेमध्ये बदल केला आहे. वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहक टिकवून ठेवणे हे एक आव्हान असते. म्हणूनच ग्राहकांना योग्य त्या सुविधा, स्वच्छतागृह उपलब्ध करुन देणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व्यक्तीची नेमणूक करणे अशे प्रयत्न केले जात आहेत.

7) काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना व्यायामशाळा, ट्रेडमिल, योगसनांसाठी जागा देणे अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत तसेच रोजच्या कामाच्यावेळात काही वेळ मनोरंजनासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग